Chandrayaan 3 : प्रज्ञानचं चंद्रावर पहिलं पाऊल, लँडर विक्रमने कॅमेऱ्यात टिपलं; पाहा VIDEO
- Published by:Suraj Yadav
Last Updated:
chandrayaan 3 : इस्रोने रोव्हर प्रज्ञान बाहेर पडत असलेला व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केलाय. हा व्हिडीओ लँडर विक्रमला लावण्यात आलेल्या कॅमेऱ्याने टिपला आहे.
दिल्ली, 25 ऑगस्ट : चांद्रयान ३ चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरल्यानंतर आता पुढचे काम सुरू झाले आहे. लँडर विक्रममधून रोव्हर प्रज्ञान चंद्रावर पाठवण्यात आला आहे. सहा चाकांचा हा रोव्हर आता लँडर विक्रममधून बाहेर चंद्रावर उतरला आहे. इस्रोने रोव्हर प्रज्ञान बाहेर पडत असलेला व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केलाय. हा व्हिडीओ लँडर विक्रमला लावण्यात आलेल्या कॅमेऱ्याने टिपला आहे.
व्हिडीओमध्ये प्रज्ञान रोव्हर लँडर विक्रमला लावण्यात आलेल्या शिडीवरून अलगदपणे चंद्रावर उतरल्याचं दिसतं. शिडीवरून खाली उतरून प्रज्ञान रोव्हर थोडा पुढेही गेल्याचं व्हिडीओत दिसत असून ३० सेंकदाचा हा व्हिडीओ इस्रोने शेअर केला आहे.
... ... and here is how the Chandrayaan-3 Rover ramped down from the Lander to the Lunar surface. pic.twitter.com/nEU8s1At0W
— ISRO (@isro) August 25, 2023
advertisement
लँडर विक्रम आणि रोव्हर प्रज्ञान चंद्राच्या भूमीवर वैज्ञानिक प्रयोग करणार आहेत. प्रज्ञान रोव्हरमध्ये दोन पेलोड्स लावण्यात आले असून ते चंद्रावर पाण्याचा शोध घेण्यासह इतर काही प्रयोग करणार आहेत. प्रज्ञान रोव्हर चंद्राच्या भूमीवर १ सेंटीमीटर प्रती सेकंद वेगाने फिरणार आहे. तसंच विक्रम लँडरच्या ५०० मीटर रेंजमध्येच प्रज्ञान रोव्हर फिरू शकेल.
advertisement
त्या 17 मिनिटांत काय काय झालं?
-विक्रम लँडरने 25 किमी उंचीवरून चंद्रावर उतरण्याचा प्रवास सुरू केला. पुढचा टप्पा गाठण्यासाठी त्याला सुमारे 11.5 मिनिटे लागली. म्हणजेच 7.4 किलोमीटर उंचीपर्यंत.
-तो 7.4 किमी उंचीवर पोहोचला तोपर्यंत त्याचा वेग 358 मीटर प्रति सेकंद होता. पुढचा दुसरा टप्पा 6.8 किलोमीटरचा होता.
-6.8 किमी उंचीवर, वेग कमी होऊन 336 मीटर प्रति सेकंद झाला. आता तिसरा आणि शेवटचा टप्पा 800 मीटरचा होता.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
August 25, 2023 12:50 PM IST
मराठी बातम्या/देश/
Chandrayaan 3 : प्रज्ञानचं चंद्रावर पहिलं पाऊल, लँडर विक्रमने कॅमेऱ्यात टिपलं; पाहा VIDEO