Chandrayaan 3 : 'ती' शेवटची 2 मिनिटं; ISRO ने शेअर केला चांद्रयान 3 च्या लँडिंगचा थरारक VIDEO

Last Updated:

चांद्रयान 3 चंद्रावर लँड करण्याआधी शेवटची 17 मिनिटं खूप महत्त्वाची होतील. त्यातील लँडिगआधी शेवटच्या दोन मिनिटांचा व्हिडीओ इस्रोने शेअर केला आहे.

लेझर इंड्युस्ड ब्रेकडाऊन स्पेक्ट्रोस्कोप चंद्रावरील केमिक्सची मात्रा आणि गुणवत्तेचा अभ्यास करेल. सोबतच खनिजांही शोध घेईल. अल्फा पार्टिकल एक्स-रे स्पेक्ट्रोमीटर मॅग्नेशिअम, अॅल्युमिनिअम, सिलिकॉन, पोटॅशिअम, कॅल्शिअम, टिन आणि लोहासारख्या एलिमेंट कंपोझिशनची स्टडी करेल.
लेझर इंड्युस्ड ब्रेकडाऊन स्पेक्ट्रोस्कोप चंद्रावरील केमिक्सची मात्रा आणि गुणवत्तेचा अभ्यास करेल. सोबतच खनिजांही शोध घेईल. अल्फा पार्टिकल एक्स-रे स्पेक्ट्रोमीटर मॅग्नेशिअम, अॅल्युमिनिअम, सिलिकॉन, पोटॅशिअम, कॅल्शिअम, टिन आणि लोहासारख्या एलिमेंट कंपोझिशनची स्टडी करेल.
नवी दिल्ली, 24 ऑगस्ट : भारतातल्या श्रीहरीकोटावरून चांद्रयान-3 हे 14 जुलै रोजी चंद्रावर गवसणी घालण्यासाठी निघालं होतं आणि  23 ऑगस्टला यानाने चंद्राच्या पृष्ठभागावर यशस्वीरित्या लँडिंग केलं.  पण चांद्रयानाचा हा प्रवास खूपच अडचणीता होता. विशेषतः शेवटची 17 मिनिटं खूप महत्त्वाची होतील. त्यातील लँडिगआधी शेवटच्या दोन मिनिटांचा व्हिडीओ इस्रोने शेअर केला आहे.
चांद्रयान-3 चंद्रावर पोहोण्यापूर्वीची ती शेवटची 17 मिनिटं फार गुंतागुंतीची होती. कारण तोच महत्वाचा टप्पा होता ज्यामध्ये खरी परीक्षा होती आणि या यायानं सॉफ्ट लँडिंग होणं गरजेचं होतं.
त्या 17 मिनिटांत काय काय झालं?
-विक्रम लँडरने 25 किमी उंचीवरून चंद्रावर उतरण्याचा प्रवास सुरू केला. पुढचा टप्पा गाठण्यासाठी त्याला सुमारे 11.5 मिनिटे लागली. म्हणजेच 7.4 किलोमीटर उंचीपर्यंत.
advertisement
-तो 7.4 किमी उंचीवर पोहोचला तोपर्यंत त्याचा वेग 358 मीटर प्रति सेकंद होता. पुढचा दुसरा टप्पा 6.8 किलोमीटरचा होता.
-6.8 किमी उंचीवर, वेग कमी होऊन 336 मीटर प्रति सेकंद झाला. आता तिसरा आणि शेवटचा टप्पा 800 मीटरचा होता.
-चंद्राच्या पृष्ठभागावर उतरताना सॉफ्ट लँडिंगसाठी लँडरचा वेग 1.68 मीटर प्रति सेकंद होता.
advertisement
आता हे सर्व कसं घडलं ते चांद्रयानातील वित्रम लँडरमधील इमेजेर कॅमेऱ्याने टिपलं आहे. चांद्रयान चंद्राला स्पर्श करण्याआधीचं हे दृश्य इस्रोने शेअर केलं आहे.
advertisement
अशा प्रकारे चांद्रयान-3 चे चंद्रावर सॉफ्ट लँडिंग झाले आणि भारतानं इतिहास घडवला. भारताचं हे चांद्रयान-3 चंद्राच्या दक्षिणेकडील ध्रुवावर उतरले आहे. ज्या टोकावर आतापर्यंत कोणताही देश पोहोचलेला नाही.
मराठी बातम्या/देश/
Chandrayaan 3 : 'ती' शेवटची 2 मिनिटं; ISRO ने शेअर केला चांद्रयान 3 च्या लँडिंगचा थरारक VIDEO
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement