Health Tips : वजनासह संपूर्ण आरोग्य जपण्यासाठी काय जास्त फायदेशीर, गहू-ज्वारी की इतर मिलेट्स?

Last Updated:
Millets for weight loss and good health : भारतीय आहारात भाकरी किंवा चपाती खूप महत्त्वाची आहे. गहू, ज्वारी, बाजरी आणि नाचणी यांसारख्या विविध धान्यांपासून बनवलेली चपाती आणि भाकरी आपल्या शरीराला आवश्यक ऊर्जा आणि पोषक तत्वे पुरवते. मात्र, प्रत्येक धान्याचे गुणधर्म आणि फायदे वेगवेगळे असतात. त्यामुळे आपल्या आरोग्याच्या गरजांनुसार आणि शरीराच्या प्रकृतीनुसार कोणते धान्य आपल्यासाठी अधिक चांगली आहे हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे.
1/7
गव्हाची चपाती : गव्हाची चपाती भारतातील बहुतांश भागांमध्ये खाल्ली जाते. गव्हाच्या चपातीमध्ये कार्बोहायड्रेट्स, व्हिटॅमिन बी आणि खनिजे असतात, जे शरीराला ऊर्जा देतात. मात्र गव्हाच्या चपातीचे जास्त सेवन केल्यास वजन वाढू शकते. तसेच यात कार्बोहायड्रेट्सचे प्रमाण जास्त असल्याने, मधुमेह आणि थायरॉईडच्या रुग्णांनी गव्हाच्या पिठात इतर धान्ये मिसळून खाणे योग्य ठरते. गव्हाच्या चपातीचे सेवन सकाळ आणि दुपारच्या जेवणात केले जाऊ शकते, पण रात्री खाणे टाळावे. कारण ती पचायला जड असते.

advertisement
2/7
बाजरीची भाकरी : बाजरीच्या भाकरीची चव आणि आरोग्य या दोन्ही निकषांवर खरी उतरते. बाजरीच्या भाकरीमध्ये भरपूर लोह असते, ज्यामुळे शरीरातील रक्ताची कमतरता दूर होते. बाजरी शरीर गरम ठेवण्यास मदत करते, म्हणून तिचे सेवन थंडीच्या दिवसांत अधिक फायदेशीर ठरते. मात्र बाजरी पचायला जड असल्याने उन्हाळ्यामध्ये तिचे सेवन कमी करावे. थंडीच्या दिवसांतही दुपारच्या वेळीच बाजरीची भाकरी खाणे योग्य असते.

3/7
ज्वारीची भाकरी : ज्वारीची भाकरीही आता सर्वत्र खाल्ली जाते. ज्वारीमध्ये ग्लूटेन नसल्यामुळे ती अधिक पौष्टिक बनते. यात कॅलरी देखील कमी असतात, ज्यामुळे वजन नियंत्रित ठेवण्यास मदत होते. मधुमेह असलेल्या रुग्णांसाठी ज्वारीची भाकरी विशेषतः फायदेशीर मानली जाते. ज्वारीची भाकरी तुम्ही दुपारच्या किंवा रात्रीच्या जेवणात समाविष्ट करू शकता.

4/7
नाचणीची भाकरी : नाचणीची भाकरी पित्त दोष संतुलित करणारी मानली जाते. शरीरात पित्त दोषाची वाढ झाली असेल तर नाचणीची भाकरी खाणे उपयुक्त ठरते. नाचणीमध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम, फायबर आणि अँटिऑक्सिडंट्स असतात. ही पचायला देखील हलकी असते. नाचणीची भाकरी खाल्ल्याने हाडे मजबूत होतात आणि रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते.

5/7
प्रत्येक धान्याच्या भाकरीची निवड ही व्यक्तीच्या शारीरिक स्थिती आणि हवामानावर अवलंबून असते. उदाहरणार्थ, बाजरी थंडीत चांगली, तर ज्वारी आणि नाचणी मधुमेह असलेल्यांसाठी उत्तम आहेत. नाचणीच्या भाकरीचे सेवन प्रामुख्याने सकाळी नाश्त्यात आणि दुपारच्या जेवणात करणे अधिक योग्य ठरते. कोणताही आहार घेताना संतुलन राखणे सर्वात महत्त्वाचे असते.

6/7
तुम्ही कोणत्या वेळेस आणि कोणत्या प्रमाणात भाकरी खाता, हे तुमच्या आरोग्यावर परिणाम करते. गहू, ज्वारी, बाजरी आणि नाचणी यापैकी प्रत्येक धान्य विशिष्ट पोषक तत्वांनी परिपूर्ण आहे. आपल्या आहारात विविधता आणणे आणि डॉक्टरांच्या किंवा आहारतज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार योग्य धान्याची निवड करणे हे निरोगी जीवनासाठी चांगले आहे.

7/7
Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि आरोग्याशी संबंधित सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून, डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतरच काहीही वापरा. त्याच्या वापरामुळे होणाऱ्या कोणत्याही नुकसानासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.

Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement