प्रेमापेक्षा देशप्रेम मोठं! होणाऱ्या नवऱ्यासमोर स्मृतीने असं काही केलं की.. Video पाहून तुम्हालाही वाटेल महाराष्ट्राच्या लेकीचा अभिमान
- Published by:Saurabh Talekar
 
Last Updated:
Smriti Mandhana Viral Video : टीम इंडियाची स्टार बॅट्समन स्मृती मानधना हिचा वर्ल्ड कप विजयानंतरचा एक व्हिडीओ व्हायरल होतोय. यात ती बॉयफ्रेंडसोबत दिसतीये.
Smriti Mandhana Palash Muchhal Viral Video : आयसीसी वुमेन्स वनडे वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये टीम इंडियाने विजय मिळवला असून 49 वर्षात पहिल्यांदाच इतिहास रचला आहे. साऊथ आफ्रिकेविरुद्धच्या अंतिम मॅचमध्ये स्मृती मानधानाने 58 बॉल मध्ये 45 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. शफाली वर्मासोबत तिने पहिल्या विकेटसाठी 104 धावांची पार्टनरशिप करत टीम इंडियाला मजबूत स्टार्ट मिळवून दिला. अशातच आता स्मृतीचा तिच्या बॉयफ्रेंडसोबतचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
पलाशने स्मृतीला घट्ट मिठी मारली अन्...
भारतीय क्रिकेटपटू स्मृती मंदाना लवकरच संगीतकार पलाश मुच्छल याच्यासोबत विवाह बंधनात अडकणार आहे. आता वर्ल्ड कप जिंकल्यानंतर दोघंही लग्न करतील, अशी चर्चा आहे. अशातच वर्ल्ड कप फायनलवेळी पलाश मुच्छल स्टेडियमवर उपस्थित होता. होणाऱ्या बायकोचा सामना पाहण्यासाठी पलाश डी.वाय पाटील स्टेडियमवर होता. अशातच मॅचनंतर पलाशने स्मृतीला घट्ट मिठी मारली. त्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. पण यावेळी स्मृतीने असं काही केलं की, अनेकांना तिचा अभिमान वाटला.
advertisement
स्मृतीने पलाशची चूक लगेच सुधारली
स्मृती मानधनाने पलाशला पाहताच मिठी मारली. त्यावेळी तिचा आनंद गगनात मावेना झाला होता. पलाशने त्याच्या खांद्यावर असलेला तिरंगा स्मृतीच्या खांद्यावर दिला. मात्र, तो तिरंगा उलटा ठेवला गेला. स्मृतीने होणाऱ्या नवऱ्याची चूक लगेच सुधारली अन् पलाशला खडसावलं. स्मृतीने तिरंगा त्याला सगळ ठेवायला लावला. स्मृतीने तिरंगा अभिमानाने खांद्यावर घेऊन मिरवला. त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडिय़ावर व्हायरल होत आहे.
advertisement
पाहा Video
guys do you think these two are dating!?? pic.twitter.com/SYKr0SVLkv
— shreya¹ᴰ | WORLD CUP WINNER BABYYYY (@93KIWIXCALAMITY) November 3, 2025
देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा
दरम्यान, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी घोषणा केली असून राज्य सरकारच्या वतीने महाराष्ट्रातील महिला खेळाडूंचा सत्कार आणि त्यांना रोख पारितोषिक दिलं जाणार आहे. यामध्ये स्मृती मानधना, राधा यादव आणि जेमिमा रॉड्रिक्स यांचा समावेश आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 04, 2025 2:43 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
प्रेमापेक्षा देशप्रेम मोठं! होणाऱ्या नवऱ्यासमोर स्मृतीने असं काही केलं की.. Video पाहून तुम्हालाही वाटेल महाराष्ट्राच्या लेकीचा अभिमान


