New Job Joining: नंतर बोलून फायदा नाही..! नव्या नोकरीत रुजू होण्यासाठी यापैकीच एक दिवस निवडा

Last Updated:

New Job joining Astrology Tips: आधुनिक कॉर्पोरेट जगात, लोक नोकरी बदलणं ही एक नवीन सुरुवात म्हणून पाहतात. पण, ज्योतिषशास्त्रानुसार, जर हा बदल अशुभ वेळी किंवा चुकीच्या मुहूर्तावर केला गेला तर त्याचा संपूर्ण करिअरवर हानिकारक परिणाम होऊ शकतो.

News18
News18
मुंबई : आजकाल चांगली नोकरी मिळणं हे मोठं मुश्कील काम बनलं आहे. मिळालेली नोकरी चांगली टिकवणं हे देखील कसब असतं. सरकारी नोकरी सगळ्यांनाच मिळू शकत नाही हे वास्तव आहे. यासाठी मिळालेली नोकरी कायम आणि चांगली राहण्यासाठी काही ज्योतिषीय गोष्टी आधीच केल्यास चिंता मिटते. ऑफिसमध्ये पहिला प्रवेश हा करिअरची दिशा ठरवणारा एक महत्त्वाचा क्षण मानला जातो.
आधुनिक कॉर्पोरेट जगात, लोक नोकरी बदलणं ही एक नवीन सुरुवात म्हणून पाहतात. पण, ज्योतिषशास्त्रानुसार, जर हा बदल अशुभ वेळी किंवा चुकीच्या मुहूर्तावर केला गेला तर त्याचा संपूर्ण करिअरवर हानिकारक परिणाम होऊ शकतो. अशा परिस्थितीत, एखाद्याच्या कठोर परिश्रमाचे परिणाम उशिरा होतात, पदोन्नती थांबते आणि कामाच्या ठिकाणी समन्वय देखील बिघडू शकतो. तर, नवीन नोकरीत सामील होण्यासाठी शुभ मुहूर्त कोणता निवडावा आणि त्यावरील शास्त्रांचे मार्गदर्शन याबाबत जाणून घेऊ.
advertisement
शुभ मुहूर्तावर कामावर दाखल होणं -
मुहूर्त चिंतामणि ग्रंथात म्हटलं आहे की, "द्वितीया, पंचमी, दशमी, एकादशी आणि त्रयोदशी शुभ आहेत आणि यश आणतात," म्हणजेच या तारखांना नोकरी किंवा कोणताही मोठा प्रकल्प सुरू करणे शुभ मानले जाते. त्यात यश मिळण्याची शक्यता जास्त असते. सोमवार, बुधवार, गुरुवार आणि शुक्रवार हे दिवस नोकरी सुरू करण्यासाठी अत्यंत अनुकूल मानले जातात, कारण ते स्थिरता, समृद्धी आणि सकारात्मक उर्जेचे प्रतीक आहेत. दरम्यान, रोहिणी, हस्त, अनुराधा आणि रेवती नक्षत्रांमध्ये काम सुरू केल्यानं दीर्घकालीन करिअर यश मिळते. त्याचप्रमाणे, अभिजित मुहूर्त हा प्रत्येक कामासाठी चिरस्थायी परिणाम मिळविण्यासाठी सर्वोत्तम काळ मानला जातो.
advertisement
कोणते दिवस आणि वेळ टाळावेत?
शास्त्रांमध्ये मंगळवार आणि शनिवार हे दिवस नोकरी सुरू करण्यासाठी प्रतिकूल मानले आहेत. या दिवशी नोकरीत रुजू झाल्यानं संघर्ष, दबाव आणि कामाच्या ठिकाणी अडचणी येऊ शकतात. त्याचप्रमाणे, अष्टमी, चतुर्दशी आणि अमावस्येच्या तारखांना कामाला सुरुवात केल्यानं करिअरमध्ये अनावश्यक ताण आणि अडचणी येऊ शकतात. शिवाय, राहुकाल आणि यमगंड काळ हे अशुभ काळ मानले जातात - या काळात जॉईन झाल्यानं कामाच्या सुरुवातीच्या टप्प्यात अडचणी आणि मानसिक अस्थिरता येऊ शकते.
advertisement
सोमवार आणि गुरुवारी जॉईन होणाऱ्यांना त्यांच्या वरिष्ठांकडून अनेकदा पाठिंबा मिळतो आणि वेळेवर बढती मिळते. बुधवार आणि शुक्रवारी जॉइन करणारे लोक टीमवर्क, नेटवर्किंग आणि कम्युनिकेशन कौशल्यांमध्ये उत्तम असतात. याउलट, अशुभ दिवशी जॉइन करणारे लोक कठोर परिश्रम करूनही योग्य दखल घेतली जात नाही किंवा त्यांच्यासाठी संधींचा अभाव असल्याचे दिसून आले आहे. त्यांना करिअरमध्ये सतत संघर्ष आणि अडचणींना तोंड द्यावे लागते.
advertisement
तुमचे करिअर आनंदी करण्यासाठी टिप्स - तुमच्या पहिल्या जॉइनिंग किंवा नवीन नोकरीच्या दिवशी, पिवळे किंवा निळे कपडे घाला. हे रंग स्थिरता आणि आत्मविश्वासाचे प्रतीक आहेत. सुरळीत आणि शुभ सुरुवात करण्यासाठी ऑफिसमध्ये प्रवेश करण्यापूर्वी "ओम गं गणपतये नमः" मंत्राचा जप करा. नवीन पेन किंवा डायरी सोबत घेऊन जा.
advertisement
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
view comments
मराठी बातम्या/अध्यात्म/
New Job Joining: नंतर बोलून फायदा नाही..! नव्या नोकरीत रुजू होण्यासाठी यापैकीच एक दिवस निवडा
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement