Train Accident : ट्रेनवर ट्रेन चढली, अपघात कसा झाला? 10 तासांच्या रेस्क्यूनंतरची थरारक दृश्यं, लोको पायलटसह 11 प्रवाशांचा मृत्यू
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
बिलासपूर येथे मेमू पॅसेंजर लोकलने मालगाडीला धडक दिल्याने ११ जणांचा मृत्यू, २० हून अधिक जखमी, सिग्नलिंग सिस्टीम आणि चालकाच्या चुकांची चौकशी सुरू.
advertisement
छत्तीसगडमधील बिलासपूर इथे सोमवारी सायंकाळी भीषण रेल्वे अपघात झाला. या अपघातानं पुन्हा एकदा रेल्वे विभागात खळबळ उडाली आहे. या अपघातात मेमू पॅसेंजर लोकल ट्रेनने समोर उभ्या असलेल्या मालगाडीला मागून जोरदार धडक दिली, ज्यात लोको पायलटसह ११ प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला. 20 हून अधिक जण गंभीर जखमी झाले आहेत.
advertisement
advertisement
दक्षिण पूर्व मध्य रेल्वे (SECR) च्या सूत्रांनी सांगितले की, प्रथमदर्शनी सिग्नल ओलांडणे हेच या दुर्घटनेचे मुख्य कारण असल्याचे स्पष्ट होत आहे. रेल्वेच्या ऑपरेशन विभागाच्या माहितीनुसार, मेमू ट्रेन बिलासपूर स्टेशनजवळ पोहोचत असताना समोरच्या मार्गावर एक मालगाडी आधीच उभी होती. मेमू ट्रेनचा चालक सिग्नलवर थांबण्यात अयशस्वी ठरला आणि ट्रेन थेट मालगाडीवर आदळली.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement


