सोनाक्षीमुळे नेहमीच राहते चर्चेत, बॉलिवूडची अशी अभिनेत्री जिने पाकिस्तानी क्रिकेटरशी केलं लग्न

Last Updated:
Sonakshi Sinha : 70-80 च्या दशकातील फेमस अभिनेत्री, जिने तिच्या काळात अनेक हिट सिनेमांत काम केलं. पण मागील काही वर्षात ती अभिनेत्री सोनाक्षी सिन्हामुळे कायम चर्चेत राहतेय. तिनं बॉलिवूड सोडून पाकिस्तानी क्रिकेटरशी लग्न केलं होतं.
1/10
ही अभिनेत्री खरंच 70-80च्या दशकातील पण मागच्या काही वर्षात ती आताची अभिनेत्री सोनाक्षी सिन्हामुळे चर्चेत आली. या अभिनेत्री तिच्या काळात आपल्या सौंदर्यानं आणि नृत्यानं प्रेक्षकांना भुरळ घातली.

advertisement
2/10
अभिनेत्रीचं करिअर व्यवस्थित सुरू असताना तिने एका पाकिस्तानी क्रिकेटरशी लग्न केलं. त्यानंतर ही अभिनेत्री पुन्हा सिनेमात दिसली नाही. पण सोनाक्षी सिन्हानं सिनेमात पदार्पण केलं त्यानंतर मात्र या अभिनेत्रीच खूप चर्चा झाली होती. 

3/10
आपण ज्या अभिनेत्रीबद्दल बोलतोय ती अभिनेत्री रीना रॉय. रीनानं अनेक वर्ष बॉलिवूडमध्ये काम केलं. तिचं आणि अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांच्या अफेअरचीही चर्चा रंगली होती. पण त्यांचं नातं फार काळ टिकलं नाही.

4/10
दरम्यान शत्रुघ्न सिन्हा यांची मुलगी अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा ही जेव्हा हिरोईन म्हणून सर्वांसमोर आली तेव्हा ती डिट्टो रीना रॉयसारखी दिसत होती. सोनाक्षी ही रीनाची मुलगी आहे अशा चर्चा देखील रंगल्या होत्या. रीनाने एका मुलाखतीत याविषयी मौन सोडलं होतं. 

5/10
अभिनेत्री रीना रॉय हिनं अपनापन, अर्पण, जानी दुश्मन, कालीचरण, नागिन सारख्या सुपरहिट सिनेमात काम केलं. त्या सिनेमांनी बॉक्स ऑफिसवर खळबळ उडवून दिली. पण रीना अचानक बॉलिवूड सोडून गेली आणि चाहत्यांना मोठा धक्का बसला. 

6/10
बॉलिवूड इंडस्ट्रीतून अचानक निघून जाण्याबद्दल विचारले असता रीना म्हणाली होती,
बॉलिवूड इंडस्ट्रीतून अचानक निघून जाण्याबद्दल विचारले असता रीना म्हणाली होती, "आता मी काय करू शकते? नियतीच्या विरुद्ध कोणीही काहीही करू शकत नाही. मी 13 किंवा 14 वर्षांची असताना चित्रपटांमध्ये प्रवेश केला."
advertisement
7/10
 "मी बीआर इशाराच्या 'जरूरत' चित्रपटापासून सुरुवात केली. लहानपणापासूनच मला नृत्य आणि अभिनयाची खूप आवड होती. मी घरी तासनतास आरशासमोर उभी राहून नाचत आणि अभिनय करत असे, ज्यामुळे माझी आई अस्वस्थ व्हायची."

8/10
रीना आणि शत्रुघ्न सिन्हा यांचं अफेअर चर्चेत आलं होतं. पण काही कारणाने दोघांचं ब्रेकअप झालं. 1983 मध्ये रीना रॉयने पाकिस्तानी क्रिकेटपटू मोहसीन खानशी लग्न केलं. लग्नानंतर ती पाकिस्तानात स्थायिक झाली. पण तिचं लग्न फार काळ टिकलं नाही. 1990 मध्ये लग्नाच्या सात वर्षांनी तिचा डिवोर्स झाला. 

9/10
डिवोर्सनंतर रीना रॉय पाकिस्तानहून मुंबईत स्थायिक झाली. मुंबई आली तोवर सोनाक्षी सिन्ही मोठी झाली होती. दोघींचा चेहरा बऱ्यापैकी मिळता जुळता आहे. 

10/10
फर्स्टपोस्टला दिलेल्या एका खास मुलाखतीत रीना रॉय यांनी स्पष्टपणे सांगितले की,
फर्स्टपोस्टला दिलेल्या एका खास मुलाखतीत रीना रॉय यांनी स्पष्टपणे सांगितले की, "हे आयुष्यातील योगायोग आहेत. कधीकधी असे घडते. उदाहरणार्थ, अभिनेता जितेंद्रची आई आणि माझी आई जुळ्या भावांसारख्या दिसतात."
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement