Pune News: पुणेकरांना दिलासा, भिडे पुलाबाबत मोठा निर्णय, आता या तारखेपर्यंत सुरू राहणार
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Niranjan Sherkar
Last Updated:
Pune News: पुणेकरांसाठी दिलासादायक बातमी असून भिडे पूल वाहतुकीसाठी पुन्हा खुला करण्यात आला आहे. वाहतूक कोंडीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.
पुणे: पुणेकरांसाठी दिलासादायक बातमी आहे. डेक्कन मेट्रो स्टेशन ते सदाशिव पेठेला जोडला जाणारा भिडे पूल प्रवाशांसाठी पुन्हा सुरू करण्यात आला आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांची आणि वाहनधारकांची होणारी गर्दी लक्षात घेऊन हा पूल सुरू करण्यात आला होता. मात्र त्यानंतर तो पुन्हा बंद करण्यात आला. परंतु, पूल बंद असल्याने वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली होती. याच पार्श्वभूमीवर हा पूल पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
पुणे शहरात पुन्हा वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाल्याने भिडे पूल दिवसा सुरू ठेवावा, तसेच रात्री मेट्रोच्या पुलाचे काम चालू ठेवावे, अशी मागणी सजग नागरिक मंचकडून मेट्रो प्रशासनाकडे करण्यात आली होती. या मागणीला प्रतिसाद देत मंगळवारी सकाळपासून पूल वाहतुकीसाठी पूर्ण वेळ सुरू करण्यात आला आहे. हा पूल आता वाहतुकीसाठी 15 नोव्हेंबरपर्यंत सुरू राहणार असल्याचे मेट्रोकडून सांगण्यात आले आहे.
advertisement
मेट्रोच्या डेक्कन स्थानकापासून ते नारायण पेठ परिसराला जोडण्यासाठी मुठा नदीवर पादचारी पूल उभारण्याचे काम सुरू आहे. या पुलाच्या कामासाठी भिडे पूल मागील काही दिवसांपासून बंद आहे. नारायण पेठेतून डेक्कन जिमखान्याकडे जाणारे आणि पेठ भागात ये-जा करणारे वाहनचालक भिडे पुलाचा वापर करतात. मात्र पूल वाहतुकीसाठी बंद असल्याने वाहनधारकांना वळसा घालून जावे लागते.
advertisement
भिडे पूल वाहतुकीसाठी बंद असल्याने याचा ताण टिळक रस्ता, शास्त्री रस्ता, लक्ष्मी रस्ता, जंगली महाराज रस्ता, कुमठेकर रोड, केळकर रोड, कर्वे रोड, फर्ग्युसन रोड, या रस्त्यांवर येतो. त्यामुळे ह्या महत्त्वाच्या रस्त्यांवर नेहमीच वाहतूक कोंडी पाहायला मिळते.
मेट्रोकडून एप्रिल महिन्यात या पुलाचे काम सुरू करण्यात आले होते, तसेच एकूण 45 दिवसांत पुलाचे काम पूर्ण करण्याचे नियोजन होते. मात्र मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच जोरदार पावसामुळे हे काम रखडले. पण मेट्रोकडून डिसेंबर शेवटपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन असल्याने पूल दिवाळीपर्यंत वाहतुकीसाठी पुन्हा बंद करण्यात आला होता.
advertisement
दरम्यान, भिडे पूल दिवसभर वाहतुकीसाठी खुला करण्यात यावा आणि रात्री 10 नंतर मेट्रोच्या कामासाठी बंद करण्यात यावा, अशी मागणी सजग नागरिक मंचकडून करण्यात आली होती. आता यावर अचानक अंमलबजावणी करण्यात आल्याने पुणेकरांना दिलासा मिळाला आहे.
view commentsLocation :
Pune,Maharashtra
First Published :
November 05, 2025 7:21 AM IST
मराठी बातम्या/पुणे/
Pune News: पुणेकरांना दिलासा, भिडे पुलाबाबत मोठा निर्णय, आता या तारखेपर्यंत सुरू राहणार


