Success Story : शिक्षण फक्त ९ वी! किचनमध्ये सुरू केली शेती, उत्पादनाला दिल्लीपर्यंत मागणी, महिला करतेय बक्कळ कमाई

Last Updated:

Agriculture Success Story : माणसामध्ये प्रचंड इच्छा शक्ती असली की त्याला कोणतेही संकट किंवा संघर्ष मोठा वाटत नाही. तो अत्यंत जिद्धीने आणि चिकाटीने समस्यांना सामोरे जात असतो. आणि त्याला अपेक्षित यशही मिळत असते.

success story
success story
 नाशिक : माणसामध्ये प्रचंड इच्छा शक्ती असली की त्याला कोणतेही संकट किंवा संघर्ष मोठा वाटत नाही. तो अत्यंत जिद्धीने आणि चिकाटीने समस्यांना सामोरे जात असतो. आणि त्याला अपेक्षित यशही मिळत असते.आज अनेक महिला आपल्या स्वत:च्या पायावर उभं राहून आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.आम्ही तुम्हाला अशाच एका महिला शेतकऱ्याची यशोगाथा सांगणार आहोत. ज्यांनी अत्यंत हालाकीच्या परिस्थितीतून मशरूम शेती यशस्वी करून दाखवली आहे.
फक्त नववी पर्यंत शिक्षण
वैशाली उदार असं महिला शेतकऱ्याचे नाव असून त्या त्र्यंबक तालुक्यातील भातपट्ट्यातील मुरुमहट्टी गावातील रहिवाशी आहेत. त्यांचं शिक्षण केवळ नववीपर्यंत झालं. २००५ साली त्यांचं लग्न कोणे गावातील शेतकरी कुटुंबात झालं. सासरचं घर लहान शेत असून, उदरनिर्वाहासाठी त्यांना आणि त्यांच्या कुटुंबाला मोलमजुरीवर अवलंबून रहावं लागायचं. त्याच काळात गावात सुरू झालेल्या महिला बचत गटात त्यांनी सक्रिय सहभाग घेतला, आणि याच गटातून त्यांना नव्या व्यवसायाची दिशा मिळाली.
advertisement
मोलमजुरीऐवजी मशरूम शेतीचा मार्ग
आज वैशाली उदार पाच वर्षांपासून यशस्वीपणे मशरूम शेती करत आहेत. त्यांनी दहा बेडपासून सुरुवात केली होती, आणि आज त्यांच्या सुसज्ज शेडमध्ये ४०० पेक्षा अधिक बेड्स आहेत. कमी जागा, कमी भांडवल आणि सतत बाजारपेठ असलेला हा व्यवसाय त्यांच्या आयुष्याचा टर्निंग पॉइंट ठरला. त्यांच्या म्हणण्यानुसार, “पूर्वी दररोजच्या मजुरीवर जगावं लागायचं, पण आज मशरूम शेतीमुळे मी स्वतःच्या पायावर उभी आहे. या व्यवसायाने माझा आणि माझ्या कुटुंबाचा संसार फुलवला.”
advertisement
शेतीला जोड व्यवसायाचा उत्तम पर्याय
वैशाली उदार यांनी केवळ आपलं आयुष्य बदललं नाही, तर गावातील अनेक महिलांना या व्यवसायाकडे प्रेरित केलं आहे. त्यांचं मत आहे की, शिक्षण कमी असलं तरीही इच्छाशक्ती आणि मेहनत असेल तर कुणीही मशरूम शेती करू शकतं. आज त्यांच्या उत्पादनाला मुंबई, दिल्ली, हिमाचल प्रदेश अशा राज्यांतून मागणी येते. त्या सांगतात, “२५० ते ३०० रुपये रोज मिळवणाऱ्या महिलांनी मशरूम शेती सुरू केली, तर त्या स्वतःचा व्यवसाय उभा करू शकतात.”
advertisement
मशरूम शेतीचे गणित
या शेतीसाठी प्रामुख्याने भात, गहू आणि सोयाबीनचा भुसा वापरला जातो. सुरुवातीला भुसा काही तास पाण्यात भिजवून उकळवला जातो आणि सुकवून त्याचे बेड तयार केले जातात. त्यात मशरूमचे बियाणे भरल्यानंतर सुमारे २० दिवसांनी उत्पादन मिळते. एक बॅच संपल्यानंतर उरलेल्या भुशापासून गांडूळखत तयार केले जाते, ज्यामुळे शेतीसाठी पूरक उत्पन्न मिळतं.
advertisement
स्त्रीशक्तीचा प्रेरणादायी संदेश
वैशाली उदार यांची ही कहाणी ग्रामीण महिलांसाठी प्रेरणादायी आहे. कमी शिक्षण असूनही त्यांनी स्वावलंबनाचा मार्ग निवडला. आज त्या केवळ यशस्वी शेतकरी नाहीत, तर इतर महिलांसाठी आत्मनिर्भरतेचं जिवंत उदाहरण बनल्या आहेत.  “शिक्षण कमी असलं तरी स्वप्नं मोठी असावीत. मी केलं तर तुम्हीही करू शकता.” असंही त्यांनी म्हंटले आहे.
एकूणच, वैशाली उदार यांची मशरूम शेती ही ग्रामीण भागातील महिलांसाठी नवीन आशेचा किरण ठरली आहे. जिद्द, परिश्रम आणि आत्मविश्वास यांच्या जोरावर त्यांनी दाखवून दिलं की, संकटं कितीही मोठी असली तरी इच्छाशक्ती असेल, तर यश नक्की मिळतं.
view comments
मराठी बातम्या/कृषी/
Success Story : शिक्षण फक्त ९ वी! किचनमध्ये सुरू केली शेती, उत्पादनाला दिल्लीपर्यंत मागणी, महिला करतेय बक्कळ कमाई
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement