UAE : अंतराळात अन्न खाणं किती कठीण? पाहा अंतराळवीर कसे खातात, VIDEO व्हायरल
- Published by:Suraj Yadav
Last Updated:
आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात अंतराळवीर अन्न कसं खातात हे त्याने सांगितलं आहे. यात तो ब्रेडला मध लावून खाताना दिसतंय.
दिल्ली, 23 ऑगस्ट : संयुक्त अरब अमिरातीचा अंतराळवीर सुलतान अल नियादी हा ६ महिन्यांसाठी अंतराळ मोहिमेवर आहे. मोहिमेवर असतानाचा एक व्हिडीओ त्याने शेअर केला आहे. आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात अंतराळवीर अन्न कसं खातात हे त्याने सांगितलं आहे. यात तो ब्रेडला मध लावून खाताना दिसतंय. व्हिडीओ शेअर करत त्याने कॅप्शनमध्ये लिहिलं की, तुम्ही अंतराळात मधाबद्दल काय विचार करता? माझ्याकडे काही मध आहे, तो मी वेळोवेळी खात असतो. याचे अनेक फायदे असून अंतराळवीरांच्या आरोग्यासाठी महत्त्वाचा आहे.
युएईतून अंतराळात जाणाऱ्या पहिल्या दोन अंतराळवीरांमध्ये नियादी आहे. त्याने आपल्या अंतराळ मोहिमेवेळी अंतराळवीर कसे राहतात हे एका व्हिडीओतून दाखवलं आहे. त्यात एक मधाची बाटली उघडून ब्रेडवर मध लावताना दिसतो.
Have you ever wondered how honey forms in space?
I still have some Emirati honey left that I enjoy from time to time. Honey has many benefits, especially for the health of astronauts. pic.twitter.com/RrjQYlNvLD— Sultan AlNeyadi (@Astro_Alneyadi) August 20, 2023
advertisement
बाटली उलटी न करता तशीच ठेवतो. अंतराळात गुरुत्वाकर्षण नसते. बाटलीतून मध काढून ब्रेडला लावतो. यावेळी तो अनेकदा ब्रेड आणि त्याला लागलेला मध तसाच हवेत सोडतो पण ते खाली न पडता हवेतच तरंगते.
अल नियादीच्या ऑफिशिलअ अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. दीड लाखहून अधिक लोकांनी हा व्हिडीओ पाहिला. एका युजरने या व्हिडीओवर मजेशीर कमेंट करताना म्हटलं की, अंतराळात कुठेही अन्न सोडू शकतो, खाली पडण्याची भीती नाही. तर दुसऱ्या एका युजरने म्हटलं की, विचित्र प्रश्न आहे पण तुम्हाला गुरुत्वाकर्षणाची आठवण येते का?
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
August 23, 2023 8:08 AM IST