TRENDING:

3-4 तासांत मॉडेलसोबत कसे पॉर्न शूट करायचे नवरा-बायको, शेजाऱ्यांनी सगळं सांगितलं

Last Updated:

Noida couple offensive video : एका आलिशान बंगल्यावर ईडीने धाड टाकली असता अश्लील व्हिडीओच्या रॅकेटचा पर्दाफाश झाला. याबाबत तपास सुरू आहे. बंगल्याच्या शेजारी राहणाऱ्यांचीही चौकशी करण्यात आली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
नवी दिल्ली : नोएडातील सेक्टर 105 मध्ये ईडीने एका बड्या पॉर्न रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. एका आलिशान बंगल्यात अश्लील व्हिडीओचं शूटिंग होत होतं. नवरा-बायको दोघांनी ग्लॅमरस लाइफस्टाईलच्या नावाने मॉडेल्स हायर केले होते आणि त्यांना अश्लील व्हिडीओ शूट करायला भाग पाडलं. याबाबत चौकशीत शेजाऱ्यांनी बरंच काही सांगितलं आहे.
प्रतीकात्मक फोटो
प्रतीकात्मक फोटो
advertisement

उज्जवल किशोर आणि अंजू श्रीवास्तव हे नवरा-बायको एका आलिशान बंगल्यात राहत होते. माहितीनुसार त्यांनी हा दोन मजली बंगला भाड्याने घेतला होता. नवरा-बायकोने मिळून सबडिजी वेंचर्स प्रायव्हेट लिमिटेड नावाची कंपनी बनवली होती. कंपनी जाहीरात मार्केटिंग रिसर्च आणि ओपनियन पोलशी संबंधित असल्याचं सांगितलं.

बायकोने नपुंसक म्हटलं तर नवऱ्याने व्हर्जिनिटीवर घेतली शंका, हायकोर्टाने असा निर्णय दिला की...

advertisement

त्यांनी सोशल मीडियावर जाहिरात देऊन शूटिंगच्या नावाने मॉडेल्सची भरती केली. ग्लॅमरस लाइफस्टाईल आणि महिन्याला एक-दोन लाखांचं आमिष दाखवत 500 तरुणी त्यांनी हायर केल्या. सुरुवातीला नॉर्मल शूट नंतर हळूहळू त्यांना अश्लील व्हिडीओ शूट करायला भाग पाडलं.

4 तासासाठी यायच्या मॉडेल

ईडीला 22 कोटी रुपयांच्या फॉरेन फंडिगबाबत माहिती मिळाली. त्याबाबत तपासासाठी 28 मार्च रोजी ईडीने धाड टाकली असता सत्य समोर आलं. ईडीच्या छाप्यात बंगल्यात वरच्या मजल्यावर एक प्रोफेशनल वेबकॅम स्टुडिओ मिळाला. जिथं हायटेक सेटअप होतं. म्हणजेइथंच शूटिंग व्हायचं. छापेमारीवेळीसुद्धा शूट सुरू होतं.

advertisement

चौकशीत शेजाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार कपल फार कुणाशी बोलत नसे. शेजाऱ्यांशी संबंध ठेवत नव्हतेदिवसातून 2-3 महिला इथं यायच्या. 4 तासांनी त्या निघून जायच्या. कपल परदेशातून आलं होतं तर या महिला त्यांच्या ओळखीच्या असाव्यात असं त्यांना वाटलं. बहुतेक मॉडेल्स सकाळी 11 ते दुपारी 2 च्या दरम्यान यायच्या. 4 तासांनी त्या निघून जायच्या. त्यामुळे हे 4 तास इथं शूटिंग व्हायचं अशी शक्यता वर्तवली जाते आहे.

advertisement

नवरीने स्वत:च सांगितली सुहागरातची स्टोरी, म्हणे, 'तो दररोज रात्री मला...'

मॉडेल्सची कॅटेगिरी

मॉडेल्सना A, B, C या तीन कॅटेगिरीत विभागलं होतं.

A कॅटेगिरी : हाय-प्रोफाइल आणि पॉपुलर मॉडल्स असायचे जे लाइव्ह स्ट्रिपिंग और एक्सक्लुझिव्ह कंटेंटसाठी बडी रक्कम घ्यायचे.

B कॅटेगिरी : मिड-लेव्हल मॉडल्स, जे मर्यादित एक्सक्लुझिव्ह कंटेंट बनवायाच्या. त्यांच्या कमाई सरासरी होती.

advertisement

C कॅटेगरी : नवीन मॉडेल्स ज्या कमी पॉप्युलर होत्या. सामान्य अश्लील कंटेट करायच्या यांना पैसेही कमी दिले जायचे.

मॉडेल्सना कॅटेगिरीनुसार पैसे मिळायचे आणि ग्राहकांकडूनही तसेच पैसे आकारले जायचे. याबदल्यात कपलला मोठी रक्कम मिळत होती. त्यातील 25 टक्के ते मॉडेल्सला देत होते. कपलने जवळपास 22 कोटी रुपये कमवले. 

परदेशी वेबसाईटवर अपलोड

कपल परदेशी वेबसाईटला आक्षेपार्ह व्हिडीओ आणि वेबकॅम शो विकत होते. साइप्रसची कंपनी टेक्नियस लिमिटेडसोबत करार केला होता. ही कंपनी एक्हॅम्सटर, स्ट्रिपचॅट अशा अश्लील वेबसाईट चालवते.   अश्लील व्हिडीओ बनवून हे कपल या कंपन्यांना विकायचे.

मराठी बातम्या/Viral/
3-4 तासांत मॉडेलसोबत कसे पॉर्न शूट करायचे नवरा-बायको, शेजाऱ्यांनी सगळं सांगितलं
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल