राजस्थानच्या अलवरमधील ही घटना आहे. वीरू जाटव नावाच्या व्यक्तीच्या घरात घडलेली. वीरूच्या मुलाने घटनेची माहिती देताना सांगितलं की, 7 जून रोजी त्याचे वडील संध्याकाळी उशिरा घरी आले. त्यांनी मोबाईल चार्जिंगला लावायला सांगितला आणि मग ते रूममध्ये गेले. त्याच्या आईने त्याला सकाळी लवकर उठायला होणार नाही म्हणून लवकर झोपायला सांगितलं.
बोंबला! हॉटेल रूमचा पडदा लावायचं राहिलं, रस्त्यावरील लोकांनी सगळं पाहिलं, कपलचा रोमान्स, ट्रॅफिक जाम
advertisement
8 जूनची मध्यरात्र मुलगा झोपला होता. तेव्हा घराचा दरवाजा उघडल्याचा हलकासा आवाज त्याला आला. त्याने पाहिले तर आईने दरवाजा उघडला होता आणि काही लोक दरवाजात होते. मुलगा घाबरला आणि लपून सर्व काही पाहू लागला.
सर्व लोक मुलाच्या पालकांच्या खोलीत गेले. मुलाने पुढे सांगितलं की बाबांचा पलंग वाजू लागला तेव्हा तो उठला. त्याने पाहिलं की आई पलंगाच्या समोर उभी होती. इतर सर्व लोकांनी बाबांना धरलं होतं. त्यांनी बाबांनाही मुक्का मारले आणि त्यांचे पाय मुरडले. त्यांनी बाबांची मान देखील मुरडली. एक व्यक्ती जिचं नाव काशी त्याने उशीने बाबांचं तोंड झाकलं होतं.
बाबांना वाचवण्यासाठी मुलाने बाबांकडे धाव घेतली. पण काशीने त्याला पकडलं आणि धमकावलं. तेव्हा त्याची आई शांतपणे उभी राहून हे सर्व पाहत होती. काही मिनिटांनी बाबांचा जीव गेला आणि मग ते लोक निघून गेले.
माहितीनुसार वीरू आणि अनिताचं लव्ह मॅरेज होतं. दोघांचंही हे दुसरं लग्न होतं. अनिताचं जनरल स्टोअर होतं. त्या दुकानाजवळच काशी कचोरीची गाडी लावत असे. तो अनेकदा अनिताच्या दुकानात सामान खरेदी करण्यासाठी येत असे. या काळात दोघांमध्ये जवळीक वाढली. मुलाने सांगितल्यानुसार घरी नसताना काशी घरी येत असे. काही दिवसांनी दोघांनीही वीरूला संपवण्याचा कट रचला.