प्लायमाउथ विद्यापीठ आणि प्लायमाउथ मरीन लॅबोरेटरीच्या शास्त्रज्ञांना त्यांच्या संशोधनात असं आढळून आलं की समुद्रातील प्रकाशाचे गुणधर्म बदलत आहेत. यामुळे फोटिक झोनची खोली कमी होत आहे. हे असे थर आहेत जिथं सूर्यप्रकाश पोहोचतो आणि 90 टक्के सागरी जीव या थरांमध्ये राहतात.
मानवी दातांचा इतिहास शोधत होते शास्त्रज्ञ, उघड झालं शॉकिंग रहस्य, त्यांचा वेगळाच उपयोग
advertisement
इंडिया टुडेच्या अहवालानुसार, या अभ्यासात 2003 ते 2022 पर्यंतचा उपग्रह डेटा आणि मॉडेल्सचा वापर करण्यात आला. सूर्यप्रकाश आणि चांदण्यांमुळे सागरी जीवसृष्टी जिथं टिकून राहते, तिथं ऑप्टिकल झोन असल्याचं उघड झालं. किनारे आणि खुल्या समुद्राचं मोठं क्षेत्र उथळ झालं आहे. आफ्रिकेच्या आकारमानाइतक्या महासागराच्या सुमारे 9 टक्के क्षेत्रफळ असलेल्या या भागात प्रकाश क्षेत्राची खोली 50 मीटरपेक्षा जास्त कमी झाली आहे. त्याचवेळी 2.6 टक्के क्षेत्रात ही घट 100 मीटरपेक्षा जास्त असल्याचं दिसून आलं आहे. समुद्राचा सुमारे 10 टक्के भागही थोडा हलका झाला आहे
प्रकाशावर अवलंबून असलेल्या जीवांना धोका
एकंदरीत समुद्र अधिक खोल होण्याची प्रवृत्ती आहे. जगण्यासाठी, पुनरुत्पादनासाठी आणि अन्न शोधण्यासाठी प्रकाशावर अवलंबून असलेल्या सागरी प्राण्यांसाठी ही चिंतेची बाब आहे. प्लायमाउथ विद्यापीठातील सागरी संवर्धनाचे सहयोगी प्राध्यापक डॉ. थॉमस डेव्हिस म्हणाले, "आमच्या निकालांवरून असं दिसून येतं की या बदलामुळे महासागर मोठ्या प्रमाणात खोल होत आहे. यामुळे सूर्य आणि चंद्रावर त्यांचं जीवन आणि पुनरुत्पादन अवलंबून असलेल्या प्राण्यांसाठी महासागराचं आकारमान कमी होतं."
कारणं आणि परिणाम काय आहेत?
शास्त्रज्ञांचा असा विश्वास आहे की किनारी भागात समुद्र खोल होण्याचं मुख्य कारण म्हणजे शेती आणि पावसाच्या पाण्यासह पोषक तत्वे आणि माती समुद्रात वाहून जाणं. यामुळे, प्लँक्टन (लहान सागरी जीव) अधिक वाढतात आणि प्रकाश तळाशी पोहोचू शकत नाही. खुल्या महासागरात शैवाळ वाढण्याच्या पद्धतीतील बदल आणि समुद्राच्या पृष्ठभागाचं वाढतं तापमान हे याचं कारण असू शकतं.
अरे देवा! आधीच कोरोना त्यात आता रहस्यमयी बॅक्टेरिया, ज्याला नष्ट करणंही मुश्किल, शास्त्रज्ञही चिंतेत
त्याचे परिणाम दूरगामी असणार आहेत. प्रकाशित क्षेत्रे लहान होत असताना, प्रकाशावर अवलंबून असलेले जीव पृष्ठभागाच्या जवळ जातील. ज्यामुळे अन्न आणि इतर गोष्टींसाठी स्पर्धा वाढेल.
मानवी जीवनावर गंभीर परिणाम
यामुळे सागरी परिसंस्थेत मोठे बदल घडून येऊ शकतात. याचा परिणाम जागतिक मत्स्यव्यवसाय, कार्बन सायकलिंग आणि हवामान नियमनात महासागराच्या भूमिकेवर होऊ शकतो. प्लायमाउथ मरीन लॅबोरेटरीचे प्रोफेसर टिम स्मिथ यांनी भर दिला की, "जर समुद्राच्या मोठ्या भागात प्रकाश क्षेत्र सुमारे 50 मीटरपर्यंत कमी होत असेल, तर प्रकाशाची गरज असलेले प्राणी पृष्ठभागाच्या जवळ येतील. जिथं त्यांना अन्न आणि इतर आवश्यक गोष्टींसाठी स्पर्धा करावी लागेल. यामुळे संपूर्ण सागरी परिसंस्थेत मोठे बदल होऊ शकतात."
या निकालांवरून असं दिसून येतं की समुद्राच्या खोलीकरणाची कारणं समजून घेणं आणि त्यांचं निराकरण करणं खूप महत्त्वाचं आहे. असं न केल्यास सागरी जैवविविधतेवर आणि मानवी जीवनावर गंभीर परिणाम होऊ शकतात.