हे प्रकरण मेदिनीनगर सदर पोलीस स्टेशन परिसरातील जोरकट परिसराशी संबंधित आहे. उत्तर प्रदेशातील मिर्झापूर जिल्ह्यातील विंध्याचल भागातील रहिवासी असलेल्या हत्तीचे मालक नरेंद्र कुमार शुक्ला यांनी चोरीची तक्रार दाखल केली आहे. नरेंद्र शुक्ला यांनी पोलिसांना सांगितलं की, त्यांना संगम लाल नावाच्या व्यक्तीकडून एका हँडरटेकिंगच्या आधारे जयमती हत्ती मिळाली होती. परंतु त्यांच्या गावात योग्य अन्न आणि पाणी नसल्याने ते या हत्तीसह झारखंडला आले होते.
advertisement
माणसासारखा बोलणारा पोपट आता मोबाईलही वापरू लागला, चोचीने कसा चालवतो फोन पाहा VIDEO
शुक्लांनी मिर्झापूर येथील रहिवासी मुन्ना पांडे आणि चुनार परिसरातील रहिवासी मन्ना पाठक यांच्यावर हत्तीची काळजी घेण्याची जबाबदारी सोपवली होती. दोघांनीही पलामू येथील दुसऱ्या हत्ती मालक तडकेश्वर नाथ यांची भेट घेतली. त्यानंतर, दोन्ही माहूत हत्तीसह जोरकट परिसरात पोहोचले.
नरेंद्र शुक्लाच्या मते, तो पहिल्यांदा 11 ऑगस्ट रोजी जोरकटला आला होता, जिथं त्याने हत्ती आणि दोन माहूतांना पाहिलं. पण 13 ऑगस्ट रोजी जेव्हा तो त्याच ठिकाणी परतला तेव्हा हत्ती किंवा तिचा माहूत तिथं नव्हता. त्यानंतर त्याने अनेक भागात शोध घेतला, पण त्याला यश मिळालं नाही. हत्तीचा पत्ता लागला नाही किंवा दोन्ही माहूतांचा कोणताही पत्ता लागला नाही.
Heart Attack : माणसांसारखा प्राण्यांनाही हार्ट अटॅक येतो का? त्यांनाही हृदयाच्या समस्या असतात का?
अखेर 12 सप्टेंबर रोजी त्यांनी या संपूर्ण प्रकरणाची लेखी तक्रार मेदिनीनगर येथील सदर पोलीस स्टेशनमध्ये दाखल केली. पोलीस स्टेशनचे प्रभारी लालजी म्हणाले की, गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर तपास सुरू आहे. त्यांनी असंही सांगितलं की, हत्तीतील चिपची माहिती वन विभागाला पाठवण्यात आली आहे. या आधारे हत्तीचं लोकेशन ट्रॅक करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.