रस्त्यावर दोन तरुणी स्कूटीवर चालल्या असतात. मात्र त्या स्टंटबाजी करण्याच्या नादात पडतात. स्कूटी घेऊन जोरात पडतात. पाहूनच त्यांना जोरात लागलं असल्याचं समजून येतंय. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही अशा रस्त्यावर स्टंटबाजीला विरोध कराल.
गाजर पाहून तोंडाला सुटतं पाणी? पण हा VIDEO पाहिल्यावर बसेल धक्का!
स्टंटबाजीचा समोर आलेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, रस्त्यावर गाड्या जात आहेत. यामध्ये स्कूटीवर दोन तरुणी आहेत. त्यातील एक तरुणी मागच्या सीटवर उभी राहिलीय. आणि एक गाडी चालवत आहेत. तेवढ्यात एक बाईक राईडर बाजूने जात असतो त्याला हाय करण्यासाठी दोघीही हात वर करतात मात्र तेवढ्यात गाडी चालवणाऱ्या मुलीचं गाडीवरचं नियंत्रण सुटतं आणि दोघीही काही अंतरावर जाऊन पडतात. याशिवाय त्यांनी हेल्मेटही घातलेलं नाही. हेल्मेट असतं तर कदाचित त्यांना कमी मार लागला असता.
advertisement
पापा की परींचा हा व्हिडीओ @uttarakhandcops नावाच्या X अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. 19 सेकंदांचा हा व्हिडीओ शेअर करत पोलिसानी लिहिलं की, 'अशी स्टंटबाजी करुन जीव धोक्यात टाकू नका, दुचाकी चालवताना नेहमी हेल्मेट घाला.'