गाजर पाहून तोंडाला सुटतं पाणी? पण हा VIDEO पाहिल्यावर बसेल धक्का!
- Published by:Sayali Zarad
Last Updated:
तुम्ही कधी विचार केलाय का, शेतातून मार्केटमध्ये पोहोचेपर्यंत आपण खात असलेल्या फळ आणि भाज्यांसोबत काय काय होतं. कदाचित हे जाणून घेतल्यावर तुम्हाला किळस वाटेल.
नवी दिल्ली : मार्केटमध्ये गेल्यावर आपण वेगवेगळी फळे, भाज्या खरेदी करत असतो. यातील अनेक फळे सलाड म्हणून लोक आवडीनं खातात. मात्र तुम्ही कधी विचार केलाय का, शेतातून मार्केटमध्ये पोहोचेपर्यंत आपण खात असलेल्या फळ आणि भाज्यांसोबत काय काय होतं. कदाचित हे जाणून घेतल्यावर तुम्हाला किळस वाटेल. मात्र काही विक्रेते विचित्र प्रकारे या भाज्या, फळे धुवून विकतात. यातील एक व्हिडीओ समोर आलाय, ज्यामध्ये काही लोक गाजर धुवत आहेत. मात्र गाजर ज्याप्रकारे साफ केलं जातंय हे पाहून ते खाण्याची इच्छाही निघून जाईल.
गाजर हे अनेकांना आवडतं. गाजरापासून बनलेले वेगवेगळे पदार्थही लोक चवीनं खातात. सध्या समोर आलेल्या व्हिडीओमध्ये गाजर ज्या प्रकारे साप केलं जातंय ते पाहून कदाचित तुम्हाला खाण्याअगोद दहा वेळेस विचार करावा लागेल.
गाजर धुण्याच्या समोर आलेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एका मोठ्या टोपलीत खूप सारे गाजर टाकले आहेत. त्याच्या बाजूने काही लोक बसले आहेत आणि ते टोपलीत पाय टाकून बसलेत. मग एक बाजूचा व्यक्ती नाल्यातील पाणी गाजरावर टाकतोय आणि हे लोक पायांनी हे गाजर साफ करत आहेत. त्यांच्या पायात चप्पलही दिसत आहे. त्यानंतर हे धुतलेले गाजर एका गोणीमध्ये भरले जातात.
advertisement
नाल्यातील पाणी अजिबात स्वच्छ दिसत नाहीये. अशा पाण्यात हे लोक गाजर धुत आहेत. जर असे गाजर ग्राहकांनी न धुता खाल्ले तर लोक आजारी पडतील. त्यामुळे हे खूपच विचित्रपणा आणि निष्काळजीपणा पहायला मिळतोय.
igusto नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओ व्हायरल होताच सोशल मीडियावर खळबळ उडाली. लोकांनी कमेंट करत या अस्वच्छतेबाबत संताप व्यक्त केलाय. व्हिडीओ इंटरनेवर वाऱ्यासारखा फिरत आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
June 03, 2024 4:09 PM IST