TRENDING:

अमर होण्याचं मिळालं मंत्र? 6 वेळा मरुन जिवंत झाली व्यक्ती, कब्रस्तानमध्ये ही पोहोचला पण शेवटच्या क्षणी...

Last Updated:

या व्यक्तीच्या जीवनात मृत्यू आणि पुनर्जन्माचा अजब खेळ घडला आहे. माहितीनुसार, इस्माईल तब्बल सहा वेळा मरण पावला, पण प्रत्येक वेळी तो पुन्हा जिवंत झाला.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : आपण अनेकदा ऐकतो की जन्म आणि मृत्यू ही माणसाच्या हातातील गोष्ट नसते. मृत्यू आला की जीवन थांबतं, हीच खरी मान्यता आहे. पण जर कोणी सांगितलं की, एखादा व्यक्ती मृत्यूच्या दारातून परत परत जगायला आला, तर हे ऐकून कुणालाही विश्वास बसणार नाही. विज्ञानाच्या दृष्टीने अशक्य वाटणारी अशीच एक चकित करणारी घटना आफ्रिकेतील तंजानिया या देशात घडली आहे.
सोर्स : सोशल मीडिया
सोर्स : सोशल मीडिया
advertisement

येथील इस्माईल अजीजी नावाच्या व्यक्तीच्या जीवनात मृत्यू आणि पुनर्जन्माचा अजब खेळ घडला आहे. माहितीनुसार, इस्माईल तब्बल सहा वेळा मरण पावला, पण प्रत्येक वेळी तो पुन्हा जिवंत झाला.

पहिल्यांदा कामाच्या ठिकाणी मृत्यू

कामाच्या दरम्यान जखमी झाल्यानंतर इस्माईलला रुग्णालयात नेण्यात आलं आणि डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. कुटुंबीयांनी दफनविधीची तयारीही सुरू केली होती. पण ताबूतात ठेवलेला इस्माईल अचानक उठून चालू लागला.

advertisement

दुसऱ्यांदा मलेरियामुळे मृत घोषित

काही दिवसांनी मलेरियामुळे त्यांना पुन्हा मृत घोषित करण्यात आलं. या वेळीही ताबूतात ठेवून दफनाची तयारी सुरू असतानाच तो पुन्हा जिवंत झाला.

तिसऱ्यांदा कार अपघातातून सुटका

एक भयानक कार अपघातात तो कोमात गेला. डॉक्टरांनी मृत घोषित केल्यानंतरही इस्माईल परत शुद्धीवर आला.

चौथ्यांदा साप चावल्यावर मृत समजलं

साप चावल्याने लोकांनी त्याला मृत मानलं आणि ताबूतात टाकलं. मात्र तीन दिवसांनी ते पुन्हा उठला.

advertisement

पाचव्यांदा-शेजाऱ्यांचा संशय

वारंवार मृत्यूनंतर जिवंत होण्यामुळे लोकांना ते भूत असल्याचा संशय आला. शेजाऱ्यांनी त्यांचं घर जाळून टाकलं. आत इस्माईल असतानाही ते वाचले.

आता एकटं आयुष्य

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
तब्बल 1 लाख 25 हजार दिवे, त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त उजळले दगडूशेठ गणपती मंदिर
सर्व पहा

मृत्यूशी झालेल्या या थरारक लढ्यामुळे इस्माईल आता सामान्य जीवन जगू शकत नाही. लोकांच्या भीतीमुळे त्याने आपलं जुनं गाव सोडलं आणि आता तो एकांतात, दूर राहातो.

advertisement

मराठी बातम्या/Viral/
अमर होण्याचं मिळालं मंत्र? 6 वेळा मरुन जिवंत झाली व्यक्ती, कब्रस्तानमध्ये ही पोहोचला पण शेवटच्या क्षणी...
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल