TRENDING:

एकटीच बसलेली तरुणी, GRPला संशय; तपासात समजलं ट्रेनमध्ये चढायला नाही, स्टेशनवर करायला आली होती घाणेरडं काम

Last Updated:

कदाचित तिच्यावर कोणी संशय घेणार नाही असा भ्रम या मुलीला झाला असावा. पण, जीआरपीच्या जवानांच्या नजरेतून ते सुटू शकली नाही.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
भोपाळ : रेल्वे स्टेशनवर बरेच लोक असतात. कुणी रेल्वेने प्रवास करण्यासाठी आलं असतं तर कुणी स्टेशनला कुणालातरी सोडायला आलं असतं. अशीच एक 23 वर्षांची तरुणी एका रेल्वे स्टेशनवर एकटीच बसली होती. पण जीआरपीला तिच्यावर संशय होता. तिची तपासणी केली. तेव्हा ती ट्रेनमध्ये चढण्यासाठी किंवा कुणाला सोडण्यासाठी आली नव्हती. तर स्टेशनवर घाणेरडं काम करायला ती आली होती. मध्य प्रदेशच्या जबलपूरमधील ही घटना आहे.
प्रतीकात्मक फोटो
प्रतीकात्मक फोटो
advertisement

चंचल शर्मा असं या तरुणीचं नाव आहे. ती जबलपूर रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 2 वर बसली होती. तिच्याकडे सुटकेस होती. एका बाकावर ती एकटीच बसली होती. तिने महागडे कपडे आणि शूझ घातले होते. ती श्रीमंत घरातीला वाटावी अशीच दिसत होती. कदाचित तिच्यावर कोणी संशय घेणार नाही असा भ्रम या मुलीला झाला असावा. पण, जीआरपीच्या जवानांच्या नजरेतून ते सुटू शकली नाही.

advertisement

जीआरपीला कसा आला संशय?

आता रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवर सुटकेस घेऊन बसली म्हणजे ती ट्रेनची वाट पाहत आहे, असंच सुरुवातीला वाटलं. पण अनेक ट्रेन येऊन गेल्या एकाही ट्रेनमध्ये ती चढली नाही. बराच वेळ ती ट्रेनमध्ये न चढल्याने जीआरपीच्या जवानांना संशय आला. त्यामुळे जीआरपीचे जवान तिच्यावर नीट लक्ष ठेवून होते. ती थोडी घाबरलेली दिसत होती आणि आतुरतेने कोणाची तरी वाट पाहत होती.

advertisement

अंतराळात झाला मोठा स्फोट; कशाचा म्हणून शास्त्रज्ञांनी तपास केला आणि धक्काच बसला

आरपीच्या जवानांनी तिला स्टेशनवर इतका वेळ का बसली आहे, असं विचारलं. तेव्हा ती घाबरली. तिनं दिलेलं उत्तरही समाधानाकारक नव्हतं. मुलीने योग्य माहिती न दिल्याने जीआरपी पोलिसांनी तिला पोलीस ठाण्यात नेलं. तिच्या सुटकेसची तपासणी केली. तेव्हा त्यातून जे बाहेर पडलं ते पाहून त्यांना धक्काच बसला.

advertisement

तरुणीच्या सुटकेसमध्ये होतं काय?

तिच्या सुटकेसमध्ये गांजा होता. 13 पॅकेटमध्ये एकूण 2 लाख 60 हजार रुपये किमतीचा 13 किलो 600 ग्रॅम गांजा आढळून आला. जीआरपीने चंचल शर्माविरुद्ध कलम 8/20 एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करून तिला अटक केली. प्राथमिक चौकशीत तिनं पोलिसांना सांगितलं की, ती इथं कोणाला तरी गांजा देण्यासाठी आली होती, त्या बदल्यात तिला काही पैसे मिळणार होते.

advertisement

खोल समुद्रात बुडालेलं आलिशान शहर सापडलं; आत आढळल्या अशा वस्तू की पाहून विस्फारतील डोळे

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
अनेक अडचणी आल्या, मात करत मायलेकीने केली यशस्वी मशरूम शेती,इतकी कमाई
सर्व पहा

आजकाल अनेक लोक पैशासाठी काहीही करायला तयार असतात. पूर्वी फक्त मुलेच अमली पदार्थांची तस्करी, चोरी आदी गुन्हे करत असत, पण आता मुलीही गुन्हेगारीच्या दलदलीत पडल्या आहेत.

मराठी बातम्या/Viral/
एकटीच बसलेली तरुणी, GRPला संशय; तपासात समजलं ट्रेनमध्ये चढायला नाही, स्टेशनवर करायला आली होती घाणेरडं काम
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल