सामान्यपणे 7-8 तासांची झोप पुरेशी असते. पण काही लोक यापेक्षा जास्त तासही झोपतात. झोपेच्या बाबतीत सगळ्यात जास्त म्हणजे 6 महिने झोपणारा कुंभकर्ण. पण तुम्हाला विश्वास बसणार नाही राजस्थानच्या नागौरच्या भादवा गावात राहणारा पुरखराम 7-8 तास किंवा 6 महिने नाही तर तब्बल 10 महिने म्हणजेच 300 दिवस आणि तासात म्हणायचं तर 7200 तास झोपतो. वर्षातील फक्त 65 दिवसच तो जागा असतो.
advertisement
पुरखरामचे एक लहान किराणा दुकान आहे, पण तो महिन्यातून फक्त 5 दिवसच ते चालवू शकतो. बऱ्याचदा दुकानात काम करताना तो झोपी जातो आणि कुटुंबाला त्याला घरी आणावं लागतं. पुरखरामने सांगितलं की जेव्हा तो दीर्घ झोपेतून उठतो तेव्हा त्याच्या दुकानाबाहेर वर्तमानपत्रांचा ढीग असतो. ही वर्तमानपत्रे मोजून त्याला कळतं की तो किती दिवस झोपला होता.
ChatGPT ला काहीही विचारताना सांभाळूनच! व्यक्तीने विचारला असा प्रश्न, जीव जाता जाता वाचला
त्याच्या कुटुंबाला त्याच्या दैनंदिन गरजा पूर्ण कराव्या लागतात, जसं की जेवण देणं, आंघोळ घालणं आणि झोपेत असताना त्याला शौचालयात नेणं. पुरखारामची पत्नी लिच्छमी देवी आणि आई कंवरी देवी म्हणाल्या की, सुरुवातीला पुरखाराम दिवसातून 15 तास झोपायचा. पण कालांतराने त्याच्या झोपेचा कालावधी वाढला आणि आता तो 20 ते 25 दिवस सतत झोपू शकतो. या काळात कुटुंबाला त्याची विशेष काळजी घ्यावी लागते. जेव्हा पुरखारामला भूक लागते किंवा त्याला शौचालयात जावं लागतं तेव्हा तो झोपेत अस्वस्थ होऊ लागतो, ज्यामुळे कुटुंबाला एक संकेत मिळतो. कुटुंब त्याला शौचालयात घेऊन जाते आणि त्याची काळजी घेते.
दुर्मिळ आजाराने ग्रस्त आहे पुरखराम
खरं तर पुरखारामला अॅक्सिस हायपरसोम्निया नावाचा एक दुर्मिळ न्यूरोलॉजिकल आजार आहे, जो जगात फार कमी लोकांमध्ये दिसून येतो. न्यूरोलॉजिस्टच्या मते, हा आजार मेंदूच्या कार्यात अडथळा निर्माण झाल्यामुळे होतो. त्याची लक्षणं म्हणजे जास्त थकवा, चिडचिड, भूक न लागणं आणि दिवसा वारंवार झोप येणं. हा आजार मेंदूतील टीएनएफ-अल्फा प्रथिनातील चढ-उतारांमुळे होतो. काही प्रकरणांमध्ये, ही स्थिती डोक्याला दुखापत, ट्यूमर किंवा अनुवांशिक कारणांमुळे देखील होऊ शकते. नॅशनल सेंटर फॉर बायोटेक्नॉलॉजी इन्फॉर्मेशन (NCBI) नुसार, हायपरसोम्निया लोकसंख्येच्या 4-6% लोकांना प्रभावित करतो.
Cancer : फक्त 6 अक्षरं फॉलो करा, कॅन्सर होणार नाही, डॉक्टरचा दावा, कसं तेसुद्धा सांगितलं
परंतु पुरखारामचं प्रकरण त्याच्या तीव्रतेमुळे अपवादात्मक आहे. ज्याचं निदान 23 वर्षांपूर्वी झालं होतं.
प्रकृती इतकी गंभीर आहे की एकदा तो झोपी गेला की त्याला उठवणं जवळजवळ अशक्य होतं. दुःखाची गोष्ट म्हणजे इतकी लांब झोप असूनही पुरखरामला विश्रांती मिळत नाही. त्याला सतत थकवा जाणवतो, डोकेदुखी आणि अशक्तपणा जाणवतो.