Cancer : फक्त 6 अक्षरं फॉलो करा, कॅन्सर होणार नाही, डॉक्टरचा दावा, कसं तेसुद्धा सांगितलं
- Published by:Priya Lad
Last Updated:
Cancer Prevention Tips : कॅन्सरला प्रतिबंध करायचा म्हणजे जीवनशैली चांगली असावी लागते. पण एखादं अक्षर फॉलो करून कॅन्सर होणार नाही, असं सांगितलं तर साहजिकच आश्चर्य वाटेल. हे कसं शक्य आहे असा प्रश्न तुम्हाला पडला असेल.
नवी दिल्ली : कॅन्सर... शब्द जरी ऐकला, वाचला की अनेकांच्या मनात धडकी भरते. कॅन्सर म्हणजे महाभयंकर आजार... कॅन्सर म्हणजे मृत्यू अटळ अशीच भीती अनेकांना वाटते. तसे आज कॅन्सरवर उपचार उपलब्ध आहेत. पण सगळ्यांना ते परवडणारे नाहीत. त्यामुळे उपचारापेक्षा प्रतिबंध बरा म्हणतात ना, तसंच कॅन्सर होणारच नाही यासाठी प्रयत्न करायला हवेत. आता फक्त 6 अक्षरं फॉलो केल्याने तुम्हाला कॅन्सर होणार नाही असं सांगितलं तर... आश्चर्य वाटेल. पण डॉक्टरांनीच हा दावा केला आहे.
कॅन्सरला प्रतिबंध करायचा म्हणजे जीवनशैली चांगली असावी लागते. पण एखादं अक्षर फॉलो करून कॅन्सर होणार नाही, असं सांगितलं तर साहजिकच आश्चर्य वाटेल. हे कसं शक्य आहे असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. आता हे कसं शक्य आहे ते जाणून घेण्याआधी ही अक्षरं कोणती आहेत ते पाहुयात.
advertisement
MEDSRX ही अक्षरं जी फॉलो केली तर कॅन्सर होणार नाही असा दावा करण्यात आला आहे. कॅन्सर तज्ज्ञ तरंग कृष्णा यांनी ही माहिती दिली आहे. या अक्षरांचा आणि कॅन्सरचा कसा आणि काय संबंध आहे हेसुद्धा त्यांनी एकएक करून सविस्तरपणे सांगितलं आहे.
M - Meditation : मानसिक आरोग्याची काळजी घेणं सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. त्यामुळे मेडिटेशन करत राहा. मानसिक आरोग्यासाठी आवश्यक आहे. यामुळे स्ट्रेस कमी होतो जो क्रोनिक इन्फ्लेमेशन आणि कमजोर रोगप्रतिकारक शक्तीसाठी कारणीभूत आहे. कोर्टिसोलसारखा स्ट्रेस हार्मोन्स कॅन्सरच्या वाढीला प्रोत्साहन देऊ शकतो. मेडिटेशनमुळे यापासून बचाव होऊ शकतो.
advertisement
E - Exercise : एक्सरसाइझमुळे शरीरातील रक्तप्रवाह चांगला राहतो, रोगप्रतिकारक शक्ती मजबूज होते, अतिरिक्त वजन कमी होतं. या सगळ्या गोष्टी कॅन्सरचा धोका वाढवतात. योगा, ब्रिस्क वॉकिंग आणि एक्सरसाइझ शरीरातील टॉक्सिनि्स बाहेर काढतं, हार्मोन्स नियंत्रित करतं. मग योगा करा, एक्सरसाइझ करत असाल जीम, चालणं, ब्रिस्क वॉकिंग, दररोज 10000 पावलं चाला, प्राणायम जे जमेल ते करा.
advertisement
advertisement
D - Diet : डाएट म्हणजे कॅन्सरपासून बचाव करणाऱ्या लाइफस्टाईलचा पाया आहे. यामुळे इम्युनिटी वाढते, स्ट्रेस कमी होतो आणि एकंदर आरोग्य सुधारतं. शक्यतो व्हेज खा. कारण यात फ्री रेडिकल्सशी लढा देणारे आणि इन्फ्लेशन कमी करणारे अँटिऑक्सिडंट, फायबर असे महत्त्वाचे घटक असतात. नॉनव्हेज, प्रोसिड फूड टाळा. नॉनव्हेज खाणार असाल तर चिकन, मासे असे व्हाईट मीट खा. रेड मी खाऊ नका. फळांचाही समावेश करा.
advertisement
S - Sleep : पेशींमध्ये सुधार होण्यासाठी आणि डिटॉक्सिफिकेशनसाठी झोप गरजेची आहे. पुरेशी आणि चांगली झोप मिळाली नाही तर मेलाटोनिनचं प्रोडक्शन बिघडवतं. ज्यामुळे ब्रेस्ट आणि प्रोस्टेट कॅन्सरचा धोका वाढतो. तशी 8 तासांची झोप गरजेची आहे. पण तुम्ही 6 तासच झोप घेत असाल तर किमान 10 वाजेपर्यंत झोपाच. मग नंतर तुम्ही तुमच्या सोयीने कधीही उठा.
advertisement
R - Relationships : रिलेशनशिप नाही तर काहीच करण्यास अर्थ नाही. रिलेशनशिपला वेळ द्यायलचा हवा. रिलेशनशिप, भावनिक परिणामाचा एकंदर आरोग्यावर परिणाम होतो. सोशल कनेक्शन मजबूत असतील तर स्ट्रेस कमी होतो, आनंद वाढतो, रोगप्रतिकार शक्ती मजबत होते आणि आजारही कमी होतात.
X - X Factor : एक्स फॅक्टर म्हणजे जी गोष्ट करण्यात तुम्हाला मजा येते, आनंद मिळतो. यामुळे स्ट्रेस कमी होतो, तुमचं मन सकारात्मक राहतं आणि याचे एकंदर आरोग्यावर चांगले परिणाम होतात.
दैनंदिन जीवनशैलीत फक्त ही 6 अक्षरं फॉलो केली तरी लक्षणीयरित्या कॅन्सरचा धोका कमी करू शकता आणि दीर्घ आयुष्य जगू शकता.
(सूचना : या लेखात दिलेली माहिती व्हायरल व्हिडीओवर आधारित आहे. न्यूज18मराठी याची हमी देत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्या.)
view commentsLocation :
Delhi
First Published :
August 08, 2025 2:29 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Cancer : फक्त 6 अक्षरं फॉलो करा, कॅन्सर होणार नाही, डॉक्टरचा दावा, कसं तेसुद्धा सांगितलं


