काय आहे व्हिडिओमध्ये?
व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये काही शाळकरी मुली ऑटोमध्ये बसलेल्या दिसत आहेत. त्यांनी मिळून आपल्या 'संजू काकां'साठी (ऑटोचालक) एक वाढदिवसाचा केक आणला आहे. काकांना याबद्दल काहीही माहिती नसल्याने, हे त्यांच्यासाठी एक मोठे सरप्राईज होते. जेव्हा काका ऑटोमध्ये येऊन बसले, तेव्हा मुलांनी केक पुढे करत त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
मुलांनी दिलेले हे अनपेक्षित सरप्राईज पाहून ऑटोचालक काकांच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि आश्चर्य स्पष्टपणे दिसतो. मुलांच्या या निरागस प्रेमाने ते भारावून गेले. या चिमुकल्यांनी केवळ केकच आणला नाही, तर त्यांच्या कृतीतून आपल्या ऑटो काकांबद्दल असलेला आदर आणि जिव्हाळा व्यक्त केला.
advertisement
नात्यापलीकडचं प्रेम
हा व्हिडिओ म्हणजे विद्यार्थी आणि त्यांना सेवा देणारे चालक यांच्यातील केवळ व्यावसायिक नात्यापलीकडचं एक सुंदर उदाहरण आहे. या मुलांसाठी ते फक्त एक ऑटोचालक नसून, दररोजच्या प्रवासातील एक प्रेमळ 'काका' आहेत. या चिमुकल्यांच्या कृतीचे सोशल मीडियावर सर्वत्र कौतुक होत असून, नेटकरी त्यांच्या संस्कारांना आणि प्रेमळ स्वभावाला सलाम करत आहेत.
हे ही वाचा : वेड्या बहिणीची वेडी ही माया! भावाच्या लग्नासाठी नोकरीला मारली लाथ, म्हणाली, माझं चुकलं काय?
हे ही वाचा : पेट्रोल भरण्यावरून दो गटात तुफान हाणामारी; VIDEO सोशल मीडियावर व्हायरल