युरोपियन स्पेस एजन्सी (ESA) नुसार सध्या अवकाशात 28000 हून अधिक वस्तू आहेत, त्यापैकी बहुतेक लो अर्थ ऑर्बिट (LEO) मध्ये आहेत. स्पेसएक्सने आतापर्यंत अंदाजे 8000 स्टारलिंक उपग्रह प्रक्षेपित केले आहेत. आणि आणखी 12000 सॅटेलाइट पाठवण्याची परवानगी मिळालेली आहे.
OMG! स्पेसमधून पहिल्यांदाच दिसलं पृथ्वीवरील असं दृश्य; पाहून शास्त्रज्ञही झाले थक्क
advertisement
जानेवारीमध्ये अंदाजे 120 स्पेसएक्स स्टारलिंक सॅटेलाइट पृथ्वीच्या वातावरणात जळून खाक झाले. एका रिपोर्टनुसार दररोज 3 ते 4 उपग्रह पृथ्वीच्या वातावरणात पुन्हा प्रवेश करत आहेत. ज्यामुळे कृत्रिम उल्कावर्षाव निर्माण होत आहेत. हे दृश्य पाहायला आकर्षक असलं तरी यामुळे पर्यावरणाला गंभीर धोका निर्माण झाला आहे, असा इशारा शास्त्रज्ञांनी दिला आहे.
पृथ्वीला काय धोका?
शास्त्रज्ञांनी सांगितलं आहे की जेव्हा उपग्रह वातावरणात पुन्हा प्रवेश करतात ते ताशी अंदाजे 27000 किमी वेगाने येतात. तीव्र घर्षणामुळे ते लगेच जळून जातात आणि त्यांच्या धातूंचं बाष्पीभवन करतात. या ज्वलन प्रक्रियेमुळे 40% उपग्रह अॅल्युमिनियम ऑक्साईडमध्ये रूपांतरित होतात. हे कण वातावरणाच्या वरच्या भागात, स्ट्रॅटोस्फियरमध्ये स्थिरावतात. हा थर सूर्याच्या हानिकारक अल्ट्राव्हायोलेट किरणांपासून पृथ्वीचं संरक्षण करतो. संशोधनात दिसून आलं आहे की हे अॅल्युमिनियम ऑक्साईड ओझोन थराला नुकसान पोहोचवू शकतात, ज्यामुळे भविष्यात गंभीर पर्यावरणीय परिणाम होण्याची शक्यता आहे.
बापरे! पृथ्वीचा अक्ष सरकला, फिरण्याचा वेग बदलला, वेळेवरही परिणाम; आता काय घडणार?
2023 मध्ये नासाने अलास्कामध्ये उच्च-उंचीवरील अभ्यास केला. त्यात असं आढळून आलं की वातावरणातील 10% पेक्षा जास्त सूक्ष्म कण उपग्रह आणि रॉकेटच्या ज्वलनामुळे निर्माण होतात. 2016 ते 2022 दरम्यान अॅल्युमिनियम ऑक्साईड कणांचं प्रमाण 8 पटीने वाढलं आहे.
शास्त्रज्ञांचा इशारा
संशोधनानानुसार स्टारलिंक उपग्रहाचं वजन सरासरी 250 किलोग्रॅम असतं आणि त्याच्या ज्वलनातून अंदाजे 30 किलोग्रॅम अॅल्युमिनियम ऑक्साईड तयार होतं, जे वातावरणात महिने ते वर्षे राहू शकतं. इतर कंपन्या देखील हजारो उपग्रह प्रक्षेपित करण्याची योजना आखत आहेत, ज्यामुळे भविष्यात ही समस्या आणखी वाढू शकते.
जर उपग्रह प्रक्षेपण याच वेगाने सुरू राहिलं तर 2050 पर्यंत हे प्रमाण 646% ने वाढू शकतं, ज्यामुळे ओझोन थराचं नुकसान होऊ शकतं. शास्त्रज्ञांनी इशारा दिला आहे की जर यावर वेळीच नियंत्रण ठेवलं नाही तर भविष्यात पृथ्वीच्या पर्यावरणावर आणि मानवी जीवनावर त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात.