शाळेतील चिमुकल्याच्या या व्हिडीओने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. व्हिडीओ तुम्ही पाहू शकता एक चिमुकला शाळेत आहे. मुलगा वर्गातून बाहेर येतो आणि फोन नंबर सांगताना दिसतो. त्याच्यासमोरून एका पुरुषाचा आवाज येतो. कदाचित तो शिक्षक असावा. जो हिंदीत विचारतो की मम्मी को फोन लगाना है या पापा को... मुलगा मराठीत बोलत असतो आणि पुरुष हिंदीत.
advertisement
OMG! गर्भातील बाळाने आपल्याच भावंडांना 'खाल्लं', सोनोग्राफी रिपोर्ट पाहून डॉक्टरही धक्क्यात
शेवटी मुलाला समोर एक महिला दिसते. कदाचित ती त्याची शिक्षिका असेल. तो तिला हाक मारतो आणि म्हणतो माझ्या मम्मीपप्पाले फोन लावून द्या बरं... मुलाच्या बोलण्यावरून तो विदर्भातील असावा असं वाटतं. समोरून महिला त्याला फोन लावून द्यायला नकार देते. तेव्हा मुलगा चेहरा रडवेला करतो आणि लावून द्या अशी विनंती करतो. तेव्हा ती महिला त्याला पप्पांचा फोन नंबर माहिती आहे का? असं विचारते. मुलगा लगेच बोबड्या भाषेत मराठीत नंबर सांगतो. अगदी न अडखळता. शहाण्णव नून्नू चार एक्याण्णव नव्वद सत्तर... सुरुवातीच्या दोन नंबरनंतर पुढचा नंबर काय तो काही समजत नाही.
व्हिडीओ पाहिल्यानंतर त्यावर बऱ्याच कमेंट येत आहे. अनेकांना व्हिडीओ आवडला आहे. बहुतेकांनी मुलाच्या मराठीवरील प्रेमाचं आणि त्याला मराठी शिकवणाऱ्या आईवडिलांचं कौतुक केलं आहे. तसंच काहींनी आपल्याला काही समजलं नाही पण आवडलं आहे, असं म्हटलं आहे.
Relationship : लग्न झाल्यानंतर बेबी प्लॅनिंग कधी करायचं? योग्य वेळ कोणती?
अनेकांना मुलाने सांगितलेले मधले नंबर काही समजले नाही आहेत. तुम्हाला ते समजले का आणि हा व्हिडीओ कसा वाटला आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.