रिमोट कॅमेऱ्याने पाण्याखालील वाहनाद्वारे अनोखा शोध लावण्यात आला आहे. या शोधामुळे केवळ शास्त्रज्ञच नाही तर संपूर्ण जगाला आश्चर्य वाटलं आहे. रिमोट कॅमेऱ्याच्या मदतीने असे अनेक प्राणी कैद झाले आहेत, जे पाहण्यास खूप विचित्र आहेत.
उरले फक्त 100 दिवस, पृथ्वी..., हार्वर्ड शास्त्रज्ञाच्या दाव्याने उडाली खळबळ, कोणतं संकट?
शास्त्रज्ञ समुद्रात एका मोठ्या दरीचा शोध घेत होते, तेव्हा अचानक त्यांना सुमारे 4 किलोमीटर (२.४ मैल) खोलीवर एक गुलाबी रंगाचा प्राणी पोहताना दिसला. या प्राण्याच्या शरीरावर कानाच्या आकाराचे पंख होते, जे तो पोहताना हलवत होता. हे पाहून शास्त्रज्ञही थक्क झाले, कारण ते अगदी डिस्नेच्या प्रसिद्ध कार्टून पात्र 'डंबो'सारखे दिसत होते.
advertisement
अर्जेंटिनाच्या पूर्व किनाऱ्यापासून सुमारे 193 मैल अंतरावर दक्षिण अटलांटिक महासागरात असलेल्या मार डेल प्लाटा पाणबुडी कॅन्यनच्या शोध दरम्यान हे फुटेज सापडले . हा प्राणी ग्रिम्पोटेउथिस नावाच्या प्रजातीचा आहे , ज्याला सामान्यतः डंबो ऑक्टोपस म्हणून ओळखलं जातं. या प्रजातीच्या एकूण 17 ज्ञात जाती आहेत. त्या सर्वांची ओळख त्यांच्या डोळ्यांवरून बाहेर पडणाऱ्या पंखांमुळे होते. डंबो ऑक्टोपस हे सर्वात खोल समुद्रातील ऑक्टोपस मानले जातात, जे अत्यंत दाब आणि अतिशीत तापमान असलेल्या वातावरणात राहतात. ते त्यांचे जेलीसारखे शरीर आणि पंख फडफडवून पोहतात.
खेळण्यांचा बॉक्स पण आतून येत होता विचित्र आवाज, उघडून पाहिलं तर अधिकाऱ्यांनीही फुटला घाम
अर्जेंटिनाच्या पाण्यात डंबो ऑक्टोपस दिसण्याची ही पहिलीच वेळ आहे, असंही शास्त्रज्ञांनी सांगितलं. लंडनमधील नॅचरल हिस्ट्री म्युझियमचे वरिष्ठ क्युरेटर जॉन अबलेट म्हणाले की, डंबो ऑक्टोपस इतर ऑक्टोपसपेक्षा खूप वेगळे असतात. ते खूप मऊ आणि जेलीसारखे असतात, ज्यामुळे त्यांचे स्वरूप एलियनसारखे दिसतं. डंबो ऑक्टोपस सहसा 20 ते 30 सेंटीमीटर पर्यंत वाढतात, परंतु सापडलेला सर्वात मोठा ऑक्टोपस 1.8 मीटर लांब आणि 5.9 किलोग्रॅम वजनाचा होता. 2020 मध्ये देखील हिंदी महासागरात 7000 मीटर खोलीवर डंबो ऑक्टोपस दिसला होता.
याच मोहिमेत काही दिवसांपूर्वी शास्त्रज्ञांनी एका डेव्हिल स्टारफिशची देखील नोंद केली होती, जो प्रसिद्ध कार्टून 'स्पंजबॉब स्क्वेअरपँट्स' च्या पॅट्रिक स्टारसारखा दिसत होता. अशा अनोख्या शोधावरून असx दिसून येतx की समुद्राच्या खोलीत अजूनही असंख्य प्राणी लपलेले आहेत, ज्याबद्दल जाणून घेण्यासारखं बरंच काही शिल्लक आहे.