मंगळवारी सीमा हैदरने रुग्णालयात मुलीला जन्म दिला. गेल्या वर्षी सीमाने तिच्या गरोदरपणाबद्दल एक व्हिडिओ शेअर केला होता. ज्यामध्ये सीमा-सचिन यांनी सांगितलं होतं की सीमा 7 महिन्यांपासून प्रेग्नंट होती. 17 मार्च 2025 ला सीमाला ग्रेटर नोएडा येथील कृष्णा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. 18 मार्च 2025 रोजी पहाटे 5 वाजता तिने एका मुलीला जन्म दिला. डॉक्टरांनी सांगितलं की, आई आणि बाळ दोघंही ठीक आहेत. लवकरच त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात येईल.
advertisement
सासूच्या पोटी जन्माला आलं जावयाचं बाळ, मुलीला झाला आनंद, सगळ्यांनी केलं कौतुक
सीमा हैदर आणि सचिन यांच्यात एका ऑनलाइन गेम खेळता खेळता प्रेमात पडले. त्यानंतर सीमा 2023 मध्ये बेकायदेशीरपणे पाकिस्तानातून भारतात आली. पोलिसांनी सचिन मीणालाही सीमाल आश्रय दिल्याच्या आरोपाखाली अटक केली होती. दोघांनी नेपाळच्या पशुपतिनाथ मंदिरात हिंदू रितीरिवाजानुसार लग्न केल्याचं सांगितलं होतं. जामीन मिळाल्यानंतर सीमा आणि सचिन पती-पत्नी म्हणून एकत्र राहत आहेत.
पण सीमाला अद्याप भारतीय नागरिकत्व मिळलेलं नाही. तरी ती भारतात राहत आहे. मग आता तिने जन्म दिलेल्या बाळाला भारतीय नागरिकत्व मिळणार की नाही असा प्रश्न आहे.
नवर्याच्या मृत्यूनंतर भावासोबत Live in Relationship मध्ये राहिली, परिणाम असा की...
भारतीय नागरिकता अधिनियम 1955 नुसार भारतात जन्मलेल्या कोणत्या बाळाच्या आई-वडिलांपैकी एक भारतीय नागरिक असेल आणि दुसरा अवैध प्रवासी नसेल तर त्या बाळाला भारतीय नागरिकत्व मिळतं. पण सीमा अवैध मार्गाने भारतात आली त्यामुळे तिच्या बाळाला भारतीय नागरिकत्व मिळण्यात अडचणी येऊ शकतात. सीमा हैदरचे वकील आणि दत्तक भाऊ एपी सिंग यांनी आधीच सांगितलं आहे की ते सीमा हैदरच्या मुलाला भारतीय नागरिकत्व मिळवून देतील.
सीमाने भारतात येताच तिच्या आधीच्या चार मुलांची नावंही बदलली होती. यात एक मुलगा फरहान अलीचं नाव बदलून राज असं केलं आहे. तर मुलींची नावं बदलून प्रियांका, मुन्नी आणि परी अशी ठेवली आहेत.