सासूच्या पोटी जन्माला आलं जावयाचं बाळ, मुलीला झाला आनंद, सगळ्यांनी केलं कौतुक

Last Updated:

Mother in law givs birth to son in law child :52 वर्षीय महिलेला ती गर्भवती असल्याचं कळलं, पण तिच्या पतीकडून नाही. आश्चर्याची गोष्ट म्हणजे नऊ महिन्यांनंतर महिलेने तिच्याच मुलीच्या पतीच्या म्हणजेच जावयाच्या मुलाला जन्म दिला.

प्रतीकात्मक फोटो
प्रतीकात्मक फोटो
नवी दिल्ली : आपल्या मुलीला बाळ होणार, आपण आजी होणार हा आनंद काही वेगळाच असतो. पण एका महिलेने चक्क तिच्या जावयाच्या बाळाला जन्म दिला आहे. आता हे पाहून खरंतर तिच्या मुलीला राग यायला हवा. पण या प्रकरणात मुलीला मात्र आनंद झाला आहे. इतकंच नव्हे तर सोशल मीडियावरही या महिलेचं कौतुक होत आहे. हे वाचून तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल.
अमेरिकेतील क्रिस्टी श्मिट जिने वयाच्या 52 व्या वर्षी मुलाला जन्म दिला आहे. तेसुद्धा तिच्या जावयाचं बाळ. हा क्षण तिच्या आयुष्यातील सर्वात मोठा टर्निंग पॉइंट ठरला. ही एका आईच्या तिच्या मुलीवरील प्रेमाची आणि त्यागाची कहाणी आहे, जिने तिच्या मुलीचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी हे पाऊल उचललं.
advertisement
क्रिस्टीची मुलगी हेडी आणि तिचा नवरा जॉनचं लग्न 2015 मध्ये झालं. तिचा पती जॉनशी लग्न केल्यानंतरही तिची इच्छा पूर्ण होऊ शकली नाही. वर्षानुवर्षे अनेक प्रयत्नांनंतरही निराशाच त्यांच्या पदरी पडली. अखेर 2020 मध्ये ती प्रेग्नंट झाली. पण तिचा आनंद जास्त काळ टिकू शकला नाही. डॉक्टरांनी तिला सांगितलं की तिला गर्भाशयाच्या डिडेल्फिस नावाची दुर्मिळ समस्या आहे. तिला  दोन गर्भाशय आहेत. ती जुळ्या मुलांची आई होणार होती, पण 10 आठवड्यात एका बाळाच्या हृदयाचे ठोके थांबले आणि 24 व्या आठवड्यात तिने तिचा दुसरा  मुलगाही गमावला. या घटनेने हेडीचे मन पूर्णपणे तुटलं. डॉक्टरांनी तिला इशारा दिला की जर ती पुन्हा गर्भवती राहिली तर ते तिच्यासाठी खूप धोकादायक ठरू शकतं.
advertisement
क्रिस्टी श्मिटला तिच्या मुलीला वेदनेत पाहून सहन होत नव्हते. दरम्यान, हेदीने तिच्या आईला सांगितले की ती आयव्हीएफ (इन विट्रो फर्टिलायझेशन) आणि सरोगसीद्वारे आई होण्याचा विचार करत आहे. आपल्या मुलीच्या आरोग्याची काळजी घेत, क्रिस्टी श्मिटने स्वतः तिच्या मुलीची सरोगेट माता होण्याचा निर्णय घेतला. जर तुम्ही या दृष्टिकोनातून पाहिलं तर, असं केल्याने क्रिस्टी तिच्या जावयाच्या मुलाला जन्म देऊन एकाच वेळी आई आणि आजी होणार होती.  तिने आपल्या मुलीला समजावून सांगितलं की ती पूर्णपणे निरोगी आहे आणि या जबाबदारीसाठी तयार आहे. मुलीसोबतच जावयानेही सासूच्या या निर्णयाला पाठिंबा दिला.
advertisement
वैद्यकीय तपासणीनंतर, डॉक्टरांनी क्रिस्टीला गर्भधारणेची परवानगी देखील दिली. यानंतर प्रक्रिया सुरू झाली आणि एका आईने तिच्या मुलीला वचन दिले की ती नऊ महिन्यांनंतर तिचे मूल तिच्या स्वाधीन करेल.  जेव्हा क्रिस्टीने तिच्या मुलीच्या बाळाला जन्म दिला तेव्हा संपूर्ण कुटुंब भावुक झालं, तिची मुलगी आणि जावई यांनी या मौल्यवान भेटवस्तूबद्दल तिचे आभार मानले. क्रिस्टी म्हणाली, हा माझ्या आयुष्यातील सर्वात सुंदर क्षण होता. मला माझ्या मुलीसाठी आणि जावयासाठी काहीतरी खास करायचं होतं आणि आता मी त्यांच्या मुलाला जन्म दिल्याने माझं मन अभिमानाने भरून आले आहे.
advertisement
बरेच लोक याला आईच्या प्रेमाचे आणि त्यागाचे एक अनोखे उदाहरण म्हणत आहेत, तर काहींनी याला विज्ञानाचा चमत्कार म्हटलं आहे. एका वापरकर्त्याने कमेंट केली की, हा खरोखरच आईचा सर्वात मोठा त्याग आहे, तर दुसऱ्या वापरकर्त्याने लिहिलं की, हे सिद्ध करते की आईसाठी तिच्या मुलांच्या आनंदापेक्षा काहीही महत्त्वाचं नाही.
मराठी बातम्या/Viral/
सासूच्या पोटी जन्माला आलं जावयाचं बाळ, मुलीला झाला आनंद, सगळ्यांनी केलं कौतुक
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement