Healthy Living : दोन डब्यात स्पर्म घेऊन आली महिला डॉक्टर, मग मायक्रोस्कोपमध्ये दाखवलं असं सत्य, पाहून प्रत्येकालाचा बसला धक्का

Last Updated:

सोशल मीडियावर एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे, जो लोकांचे डोळे उघण्यासाठी फायद्याचा ठरु शकतो.

प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो
मुंबई : आजकाल खूप जोडप्यांना बाळ होण्यासाठी खूप अडचणी येतायत. यामागे आपली बदलती जीवनशैली, धावपळीचं आयुष्य, कामाचा ताण, या सगळ्याचा परिणाम आपल्या शरीरावर होतोय. आधी अश्या गोष्टी क्वचितच ऐकायला मिळायच्या पण आता तर सगळीकडे हीच अवस्था आहे. शिवाय हल्ली जोडपी करिअर आणि शिक्षण या सगळ्यामुळे उशीरा लग्न करतात, ज्यामुळे देखील मुलं व्हायला अडचणी निर्माण होतात.
नुकताच एका महिला डॉक्टरने सोशल मीडियावर एक महत्वाची गोष्ट सांगितली. ज्यामुळे ही महिला चर्चेचा विषय बनली आहे. बाळ का होत नाही याचं एक मोठं कारण तिने सर्वांसमोर मांडलं. ते कारण म्हणजे धूम्रपान.
आता तुम्ही म्हणाल की धूम्रपान तर पुरुष करतात मग त्याचा परिणाम बाळ होण्यावर कसा होऊ शकतो ? तर एका महिला डॉक्टरने याचं उत्तर एका प्रयोगाद्वारे दिलं.
advertisement
त्यांनी लोकांना दाखवण्यासाठी दोन डबे घेतले. एका डब्यात धूम्रपान न करणाऱ्या पुरुषाचे शुक्राणू होते तर दुसऱ्या डब्यात रोज सिगारेट ओढणाऱ्या पुरुषाचे शुक्राणू होते . आता या दोन्ही डब्यातील शुक्राणू महिला डॉक्टरने सूक्ष्मदर्शकाखाली तपासले.
advertisement
जेव्हा धूम्रपान न करणाऱ्याचे शुक्राणू सूक्ष्मदर्शकाखाली पाहिले तेव्हा सगळेच थक्क झाले. कारण त्यात असंख्य शुक्राणू वेगाने हालचाल करत होते. म्हणजेच ते निरोगी होते आणि बाळ होण्यासाठी सक्षम होते. पण जेव्हा सिगारेट ओढणाऱ्या पुरूषाचे शुक्राणू पाहिले तेव्हा ते खूपच कमी संख्येने दिसले आणि त्यांची हालचालही मंद होती. म्हणजेच सिगारेटमुळे त्यांची गुणवत्ता खूपच खराब झाली होती.
advertisement
यावरून महिला डॉक्टरने सांगितलं की धूम्रपानामुळे पुरूषांच्या शुक्राणूंवर परिणाम होतो आणि त्यामुळे बाळ होण्यास अडचण येते. त्यामुळे जे जोडपं बेबी प्लानिंग कर आहे किंवा बाळ होण्यासाठी प्रयत्न करत आहेत अशा पुरुषांनी ध्रुम्रपान पिणं सोडून दिलं पाहिजे.
view comments
मराठी बातम्या/Viral/
Healthy Living : दोन डब्यात स्पर्म घेऊन आली महिला डॉक्टर, मग मायक्रोस्कोपमध्ये दाखवलं असं सत्य, पाहून प्रत्येकालाचा बसला धक्का
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement