advertisement

ऑनलाइन गर्लफ्रेंडला पहिल्यांदाच भेटायला गेला नवरा, बायकोने केलं वेलकम, प्रकरण काय?

Last Updated:

व्यक्तीला सोशल मीडियावर एका महिलेची फ्रेंड रिक्वेस्ट आली. त्याने ती लगेच स्वीकारली. त्यांच्यात प्रेम सुरू लागलं. एकदा या महिलेने त्याला हॉटेलमध्ये भेटायला बोलावलं. तो हॉटेलमध्ये गेला. पण...

AI Generated Image
AI Generated Image
नवी दिल्ली : आपल्या नवऱ्याचं दुसऱ्या कोणत्या महिलेसोबत संबंध आहेत, हे कोणत्याच पत्नीला आवडणार नाही. असं असताना एका महिलेने तिचा नवरा त्याच्या गर्लफ्रेंडला भेटायला गेला असता तिनं त्याचं स्वागत कसं काय केलं, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. हे वाचूनच तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल. मध्य प्रदेशच्या ग्वाल्हेरमधील हे प्रकरण आहे.
ग्वाल्हेरमध्ये राहणारं हे जोडपं. व्यक्तीला सोशल मीडियावर एका महिलेची फ्रेंड रिक्वेस्ट आली. त्याने ती लगेच स्वीकारली. त्यांच्यात प्रेम सुरू लागलं. एकदा या महिलेने त्याला हॉटेलमध्ये भेटायला बोलावलं. तो हॉटेलमध्ये गेला. पण दार उघडलं तर काय, समोर चक्क त्याची बायको उभी होती.
advertisement
नवऱ्याला रंगेहाथ पकडण्यासाठी बायकोनेच असा सापळा रचला की तो अवाक झाला. नवऱ्याला फ्लर्टिंग आणि नवीन महिलांशी प्रेमसंबंध ठेवण्याची हौस होती. बायकोला हे माहित होते. तिला त्याच्यावर संशय होता. याबाबत त्य़ाला विचारलं तेव्हा त्याने तिला शिव्या दिल्या. त्याने ते मान्य नाही. त्याने बायकोने आपल्यावरील लावलेले आरोप फेटाळले. मग एके दिवशी तिने त्याला रंगेहाथ पकडायचं ठरवलं.
advertisement
तिने फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर पायल नावाने फेक अकाउंट तयार केलं आणि त्याद्वारे तिच्या पतीला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली. एका अनोळखी महिलेकडून मैत्रीचं आमंत्रण पाहून पतीने लगेच ते स्वीकारलं. त्यानंतर तिने त्याला एकदा फोन केला आणि हॉटेलमध्ये भेटायला बोलावलं. प्रेयसीकडून आमंत्रण मिळताच तो ताबडतोब हॉटेलमध्ये पोहोचला आणि त्याला धक्का बसला. इथे त्याच्या प्रेयसीऐवजी त्याची पत्नी त्याची वाट पाहत होती.
advertisement
पत्नीने पतीला रंगेहाथ पकडलं आणि त्याल चांगलाच चोप दिला. त्यानंतर पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली. पोलिसात त्याने आपल्यावरील आरोप खोटे असल्याचं सांगितलं. पत्नीने सगळे पुरावे पोलिसांन दिले. पोलिसांनी त्याला तुरुंगात टाकण्याची भीती घातली. तेव्हा त्याने आपला गुन्हा मान्य केला. पत्नीची माफी मागितली आणि असं कृत्य पुन्हा करणर नाही, अशी शपथही घेतली.
advertisement
view comments
मराठी बातम्या/Viral/
ऑनलाइन गर्लफ्रेंडला पहिल्यांदाच भेटायला गेला नवरा, बायकोने केलं वेलकम, प्रकरण काय?
Next Article
advertisement
Gold Silver Price:  ट्रम्प यांची एक धमकी अन् बाजारात उलथापालथ, सोन्यानं गाठला रेकोर्ड ब्रेक दर, चांदीही महागली, एक्सपर्ट म्हणतात, 'आता...'
ट्रम्प यांची एक धमकी अन् बाजारात उलथापालथ, सोन्यानं गाठला रेकोर्ड ब्रेक दर, चां
  • मागील काही दिवसांपासून सोनं-चांदीच्या दरात तुफान तेजी आली आहे.

  • सोनं-चांदीचे दर नवीन उच्चांक गाठत आहेत.

  • आज, जागतिक बाजारपेठेत सध्या सोन्याने सर्व रेकॉर्ड मोडीत काढले आहेत.

View All
advertisement