भारतात बरीच मंदिरं आहेत, ज्यांच्या कथा किंवा काही ना काही रहस्य आहेत. अशाच मंदिरांपैकी एक हे मंदिर. जे हिमाचल प्रदेशातील शिमला येथील दुर्गा मातेचं हे मंदिर. श्राई कोटी माता नावाने प्रसिद्ध आहे. समुद्रसपाटीपासून 11000 फूट उंचीवर असलेल्या शिमला येथील रामपूरमध्ये हे मंदिर आहे. जे शतकानुशतके श्रद्धेचे केंद्र आहे. हे मंदिर माता भीमाकाली ट्रस्टद्वारे राखलं जातं.
advertisement
Cheapest Gold : तुम्हाला फक्त दुबईच माहिती, पण अशी 7 ठिकाणं जिथं मिळतं स्वस्त सोनं
कपल या मंदिराला भेट देऊ शकतात पण एका वेळी फक्त एकच मंदिरात जाऊ शकतो. इथं पती-पत्नीला एकत्र दर्शन किंवा पूजा करू दिली जात नाही. असं म्हटलं जातं की जर एखाद्या जोडप्याने मूर्ती पाहण्यासाठी मंदिरात प्रवेश केला तर त्यांना शिक्षा भोगावी लागते.
यामागे आख्यायिका अशी की, भगवान शिवाने त्यांचे दोन पुत्र गणेश आणि कार्तिकेय यांना विश्वाची प्रदक्षिणा करण्यास सांगितलं. कार्तिकेय आपल्या वाहनातून निघाले, पण गणेशाने आपल्या पालकांना प्रदक्षिणा घातली आणि विश्व पालकांच्या चरणी आहे, असं सांगितलं. कार्तिकेय विश्वाची प्रदक्षिणा करून परत येईपर्यंत गणेशाचं लग्नही झालं होतं. त्यामुळे कार्तिकेय रागावला आणि त्याने कधीच लग्न न करण्याची प्रतिज्ञा केली.
अद्भुत! धगधगत्या सूर्याला चिरत गेला रॉकेट, पहिल्यांदाच कॅमेऱ्यात कैद झालं असं दृश्य, Watch Video
कार्तिकेयने अविवाहित राहण्याच्या प्रतिज्ञा घेतली यामुळे देवी पार्वती खूप क्रोधित झाली. इथं तिच्याकडे येणारे पती-पत्नीही वेगळे होतील, असं तिनं सांगितलं. यामुळे आजही या मंदिरात पती-पत्नी एकत्र पूजा करत नाहीत.