TRENDING:

शार्कने गिळला कॅमेरा; त्याच्या शरीरात असं काही दिसलं की विश्वासच बसणार नाही; VIDEO VIRAL

Last Updated:

शार्कने एखाद्याला गिळल्यावर आत काय होत असेल, असा प्रश्न अनेकांना पडला असेल. तेच दाखवणारा हा व्हिडीओ आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
नवी दिल्ली :  शार्कचे बरेच व्हिडीओ तसे तुम्ही पाहिले असतील. पण शार्कचा एक असा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे जो पाहून प्रत्येक जण थक्क झाला आहे. शार्कने कॅमेरा गिळला आहे आणि या कॅमेऱ्यात त्याच्या शरीरातील आतील दृश्य कैद झालं आहे. शार्कच्या शरीरात असं काही दिसलं की पाहून तुम्हाला विश्वास बसणार नाही.
शार्कने कॅमेरा गिळल्यानंतर...
शार्कने कॅमेरा गिळल्यानंतर...
advertisement

शार्क ज्याचा जगातील सर्वात धोकादायक प्राण्यांच्या यादीत समावेश होतो. पाण्यातील सर्वात खतरनाक प्राणी कोण विचारलं तर साहजिकच आधी शार्कचं नाव तोंडात येईल. शार्कच्या हल्ल्यात अनेकांना जीव गमवावा लागला आहे. शार्कने माणसांवर केलेल्या हल्ल्याशीसंबंधित व्हिडीओ अनेकदा व्हायरल होतात. त्यावेळी शार्कने एखाद्याला गिळल्यावर आत काय होत असेल, असा प्रश्न अनेकांना पडला असेल. तेच दाखवणारा हा व्हिडीओ आहे.

advertisement

इकडे मगर, तिकडे सिंह; दोघांच्या मध्ये अडकलेल्या हरणानं स्वतःला कसं वाचवलं? पाहा VIDEO

व्हिडीओत तुम्ही पाहू शकता शार्क पाण्यात पोहोत असतो. त्यावेळी त्याच्यासमोर एक कॅमेरा येतो. एका डायव्हरचा हा कॅमेरा. शार्कला ती खाण्याची वस्तू वाटते म्हणून तो कॅमेरा गिळतो. शार्कच्या तोंडात गेल्यानंतरही कॅमेरा सुरूच राहतो. या कॅमेऱ्यात शार्कच्या शरीरातील दृश्य कैद होतं.

advertisement

शार्कच्या शरीरात काय दिसलं?

शार्कच्या तोंडात कॅमेरा घुसताच एक वेगळंच जग जाणवू लागलं. त्याच्या आतील त्वचा पांढरी असते. आतील त्वचेला भेगा पडल्यासारख्या होत्या. जेव्हा शार्क कॅमेरा गिळण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा या भेगा आकुंचन, प्रसरण पावतात. ज्यावरून असं दिसतं की जेव्हा शार्क काही खातो तेव्हा त्या विवरांच्या आकुंचन आणि विस्तारामुळे ती त्याच्या पोटात जाते. काही वेळाने शार्क तोंडातून कॅमेरा काढून टाकतो आणि तिथून निघून जातो.

advertisement

बैल आणि वळूमध्ये फरक काय? दोघंही गायीची नर वासरं मग त्यांच्यात वेगळं काय?

व्हिडीओवर प्रतिक्रिया काय?

@AMAZlNGNATURE या ट्विटर अकाऊंटवर हा आश्चर्यकारक व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. व्हिडीओवर बऱ्याच कमेंट येत आहेत. शार्कच्या शरीरातील दृश्य पाहून अनेकजण थक्क झाले. एका युझरने शार्कच्या आतील त्वचा सारखीच असते हे माहिती नव्हतं, असं म्हटलं आहे. तर शार्कनं कॅमेरा तोंडातून बाहेर काढण्यावर एका युझरने मजेशीर प्रतिक्रिया दिली आहे. शार्कला ते चवदार वाटलं नसल्याचं त्यानं म्हटलं आहे.

advertisement

शार्कचा हा व्हिडीओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.

मराठी बातम्या/Viral/
शार्कने गिळला कॅमेरा; त्याच्या शरीरात असं काही दिसलं की विश्वासच बसणार नाही; VIDEO VIRAL
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल