इकडे मगर, तिकडे सिंह; दोघांच्या मध्ये अडकलेल्या हरणानं स्वतःला कसं वाचवलं? पाहा VIDEO
- Published by:Priya Lad
Last Updated:
सिंह आणि मगरीच्या रूपात दोन्ही बाजूने मृत्यू होते पण तरी हरण बचावलं आहे. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.
नवी दिल्ली : इकडे आड, तिकडे विहिर ही म्हण तर तुम्हाला माहितीच असेल. अशीच परिस्थिती समोर आली ती एका हरणासमोर. त्याच्या दोन्ही बाजूला मृत्यू होता. तो मृत्यूच्या मधोमध उभा होता. पण त्यातूनही त्याने आपला जीव वाचवला आहे. या हरणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे.
जंगलात सर्वात खतरनाक शिकारी म्हटले तर ते म्हणजे सिंह आणि मगर... एक जंगलाचा राजा तर दुसरा पाण्यातील. एक हरण या दोन खतरनाक प्राण्यांच्या मधोमध अडकलं. पाण्यात मगर आणि पाण्याबाहेर सिंह... अशा परिस्थितीत हे हरण होतं. पाण्यात राहिलं तर मगर जीव घेणार आणि जीव वाचवण्यासाठी पाण्याबाहेर पडलं तर सिंह. पण या परिस्थितीतही हरणाने हुशारीनं स्वतःचा जीव वाचवला. आता ते कसं ते पाहुयात.
advertisement
व्हिडीओत तुम्ही पाहाल तर एक तलाव आहे. तलावाच्या आत एक हरण आहे आणि तलावाच्या किनाऱ्यावर सिंह. तलावात मगरही आहे. ज्याने हरणावर हल्ला केला. हरणाची शिकार करण्याचा प्रयत्न मगरीनं केला. पण हरणाने मगरीवर लाथा मारून कशीबशी तिच्या तावडीतून आपली सुटका केली आणि ते पाण्याबाहेर आलं.
advertisement
पण पाण्याबाहेरही मृत्यू त्याची वाट पाहत होता. जसं हरण पाण्याबाहेर आलं तसं सिंह त्याच्यावर धावून गेला. हरणही घाबरलं नाही ते तिथंच थांबलं. हरणाला तसं शांत पाहून सिंहही शांत झाला. थोडावेळ दोघंही एकमेकांसमोर उभे राहिले. सिंहाचीही हरणाजवळ जाण्याची हिंमत काही होत नव्हती. मध्ये हरणच सिंहाच्या दिशेनं धावत गेलं. तसा सिंहही घाबरला. त्यानेही हरणाची हिंमत पाहून माघारच घेतली.
advertisement
व्हिडीओच्या शेवटी हरणाची शिकार न करता सिंहच त्याच्यापासून दूर जाताना दिसतो आणि अशा पद्धतीनं हरणाचा जीव वाचतो.
What lesson did you learn from this? pic.twitter.com/IoQrZ7ovNS
— Nature is Amazing ☘️ (@AMAZlNGNATURE) March 20, 2024
advertisement
@AMAZlNGNATURE या ट्विटर अकाउंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. व्हिडीओवर बऱ्याच कमेंट येत आहेत. कठीण परिस्थितीत फक्त तिुमचं धैर्यच तुम्हाला वाचवू शकतं, अशी कमेंट एका युझरने केली आहे. तुमची या व्हिडीओवरील प्रतिक्रिया आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या.
Location :
Delhi
First Published :
March 22, 2024 11:07 AM IST
मराठी बातम्या/Viral/
इकडे मगर, तिकडे सिंह; दोघांच्या मध्ये अडकलेल्या हरणानं स्वतःला कसं वाचवलं? पाहा VIDEO