कधी पाहिलाय का लाल नाग? Video पाहून तुमचाही डोळ्यांवर विश्वास बसणार नाही
- Published by:Devika Shinde
Last Updated:
लाल नाग कोणी पाहिलेला नाही किंवा त्याबद्दल कुठे वाचण्यातही आलेलं नाही. मग आता हा लाल चटक रंगाचा नाग आला कुठून?
मुंबई : प्राण्यांशी संबंधीत नेहमीच वेगवेगळे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. प्राण्यांचे हे व्हिडीओ कधी धक्कादायक क्षणांचे असतात. तर कधी अजब प्रकाराचे. काही प्राण्यांची तर नव्यानेच ओळख या व्हिडीओमध्ये होते. लाल नागाचा व्हिडीओ ऑनलाइन चर्चेचा विषय बनला आहे.
लाल नाग कोणी पाहिलेला नाही किंवा त्याबद्दल कुठे वाचण्यातही आलेलं नाही. मग आता हा लाल चटक रंगाचा नाग आला कुठून? असा प्रश्न लोकांना पडला आहे, ज्यामुळे अनेक लोक या नागाबद्दल आणखी गोष्टी जाणून घेण्यात उत्सुक आहेत.
हा व्हिडीओ खरा आहे की खोटा, असा प्रश्न लोकांना पडला आहे. साप पाहिल्यानंतर अनेकदा लोक घाबरतात. मात्र, हा अनोखा साप पाहिल्यानंतर लोकांना उत्सुक्ता लागली आहे.
advertisement
व्हिडीओमध्ये, एक माणूस लाल रंगाचा साप पकडत आहे, जो ताबडतोब कोब्रासारखा फणा पसरवतो. पण, लाल रंगाच्या नागाची उपस्थिती लोकांना संशयास्पद बनवते. या व्हिडीओला इंस्टाग्रामवर जवळपास 17 हजार लोकांनी लाईक केले आहे. हे खरे आहे की नाही यावर लोकांमध्ये चर्चा सुरू झाली आहे.
हा व्हिडीओ पाहून सोशल मीडियावर लोकांना तो खरा आहे की नाही, अशी शंका आली. लाल साप असू शकतो यावर काही लोकांचा विश्वासही बसत नाही. अनेक जण म्हणू लागले की एकतर सापाला रंग दिला आहे किंवा व्हिडीओमध्येच काहीतरी गडबड झाली आहे.
advertisement
advertisement
व्हिडीओमधील सापाचं सत्य काय?
हा व्हिडीओ खरा आहे की नाही हे माहीत नाही, पण हा रेड कोब्रा खरंच अस्तित्वात आहे, असं काही सर्पमित्रांनी सांगितलं आहे.
A-Z Animals च्या मते, हे दुर्मिळ साप प्रामुख्याने आफ्रिकेत, इजिप्त, टांझानिया, युगांडा आणि सुदान सारख्या भागात आढळतात. त्यांचे शास्त्रीय नाव नाजा पल्लीदा आहे. त्यांचे वैशिष्ट्य म्हणजे ते विष थुंकू शकतात.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
March 21, 2024 5:56 PM IST