पिल्लाला वाचवण्यासाठी मगरीसोबत भिडलं माकड; VIDEO चा शेवट पाहून डोळ्यात येईल पाणी
- Published by:Kiran Pharate
Last Updated:
मगरीने माकडाच्या पिल्लाला आपलं शिकार बनवलं असल्याचं दिसतं. ती पिल्लाला तोंडात घेऊन पाण्यातून बाहेर जात होती
नवी दिल्ली : आपल्या मुलांना कोणत्याही संकटातून बाहेर काढण्यासाठी आई काहीही करू शकते. तुम्ही अनेकदा याचा प्रत्यय देणाऱ्या घटना ऐकल्या किंवा पाहिल्या असतील. अशात जर आपल्या मुलाचा जीव धोक्यात असेल तर त्याला वाचवण्यासाठी ती स्वतःचा जीव द्यायलाही तयार होते. हे फक्त माणसांमध्येच नाही तर प्राण्यांमध्येही पाहायला मिळतं. सध्या अशाच एका घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे. यात एक माकड आपल्या पिल्लाला वाचवण्यासाठी जे करतं, ते पाहून तुम्ही थक्क व्हाल.
पाण्यातील राक्षस अशी ओळख असलेल्या मगरीचा हा व्हिडिओ आहे. यात जे काही घडतं ते पाहून तुम्ही थक्कही व्हाल आणि इमोशनलही. यात मगरीने माकडाच्या पिल्लाला आपलं शिकार बनवलं असल्याचं दिसतं. ती पिल्लाला तोंडात घेऊन पाण्यातून बाहेर जात होती. तेव्हाच मादी माकडाने मगरीवर हल्ला केला आणि आपल्या पिल्लाला तिच्या तावडीतून सोडवलं., पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. मगरीने पिल्लाला ठार मारलं होतं.
advertisement
— NATURE IS BRUTAL (@TheBrutalNature) March 19, 2024
व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, की मगर माकडाच्या बाळाला तोंडात धरून पाण्यातून कशी बाहेर येते. तेव्हाच बबून नावाचं भयंकर माकड तिच्यावर हल्ला करतं आणि मगरीला तिथून पळवून लावतं. नंतर माकड आपल्या पिल्लाला घेऊन जातं. नंतर ते आपल्या पिल्लाला उचलून घेतं. परंतु दुर्दैवाने पिल्लाचा मृत्यू झाला होता. @TheBrutalNature या अकाऊंटवरुन हा भावनिक व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर शेअर करण्यात आला आहे. अवघ्या 36 सेकंदांचा हा व्हिडिओ आतापर्यंत 54 हजारांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे, तर शेकडो लोकांनी या व्हिडिओला लाईकही केलं आहे.
advertisement
हा व्हिडिओ पाहिल्यानंतर लोकांनी यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. कुणी म्हणतंय की, ‘बबूनने आपल्या पिल्लाला वाचवलं, पण दुर्दैवाने त्याचा मृत्यू झाला’, कुणी म्हणतंय की ‘कदाचित सीपीआर दिला असता तर प्राण वाचला असता’, तर काही यूजर्स हे दृश्य पाहून भावूकही झाले आहेत.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
March 22, 2024 8:44 AM IST
मराठी बातम्या/Viral/
पिल्लाला वाचवण्यासाठी मगरीसोबत भिडलं माकड; VIDEO चा शेवट पाहून डोळ्यात येईल पाणी