7 मुलांच्यात मालमत्तेवरून वाद
ही घटना राजस्थानमधील लीला का बास की ढाणी या गावात 3 मे रोजी घडली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. त्यात तो माणूस आपल्या आईच्या चितेवर चढून बसलेला दिसत आहे आणि तिच्याकडील दागिने त्याला देण्याची मागणी करत आहे. गावकऱ्यांनी सांगितलं की, मृत महिलेचं नाव भूरी देवी होतं. त्यांचं 3 मे रोजी निधन झालं. भूरी देवी यांना सात मुलं होती. त्यापैकी सहा गावातच राहत होते, पण पाचवा मुलगा ओमप्रकाश वेगळा राहत होता. गेल्या काही वर्षांपासून ओमप्रकाश आणि त्याच्या इतर भावांमध्ये कौटुंबिक मालमत्तेवरून वाद सुरू होता.
advertisement
...आणि वाद सुरू झाला
मिळालेल्या माहितीनुसार, मृत्यूनंतर घरी काही विधी झाल्यावर वृद्ध महिलेच्या अंगावरील चांदीचे आणि इतर दागिने काढण्यात आले. त्यानंतर अंत्यसंस्कारासाठी मृतदेह स्मशानभूमीत नेण्यात आला. आईचे सगळे दागिने मोठ्या मुलाकडे, गिरिधारीकडे सोपवण्यात आले होते. त्यानंतर वृद्ध महिलेच्या अंत्यसंस्कारासाठी चिता रचण्याचं काम सुरू होतं. त्याच वेळी ओमप्रकाश आणि त्याच्या इतर भावांमध्ये वाद सुरू झाला.
दागिने मिळत नाही, तोपर्यंत अंत्यसंस्कार नाही
ओमप्रकाश त्याच्या इतर भावांसोबत आईचा मृतदेह खांद्यावर घेऊन स्मशानभूमीत आला. तिथे त्याने त्याच्या आईचे सगळे दागिने त्याला देण्याची मागणी केली. भावांबरोबर वाद सुरू असतानाच, ओमप्रकाश अचानक त्याच्या आईच्या चितेवर झोपला. सगळ्यांना आश्चर्य वाटलं, त्याने मागणी केली की जोपर्यंत त्याला दागिने मिळत नाहीत तोपर्यंत तो त्याच्या आईचा अंत्यसंस्कार होऊ देणार नाही.
नातेवाईकांनी आणि गावकऱ्यांनी वारंवार प्रयत्न केले, तरी ओमप्रकाश त्याच्या मागणीवर ठाम राहिला. अखेरीस, घरातील वृद्ध महिलेचे सगळे दागिने आणून ओमप्रकाशला देण्यात आले. त्यानंतर त्या माणसाने त्याच्या आईच्या शरीरावर अंत्यसंस्कार करण्याची परवानगी दिली. या घटनेमुळे वृद्ध महिलेचा अंत्यसंस्कार सुमारे दोन तास उशिरा झाला.
हे ही वाचा : Vastu Tips : देव्हाऱ्यात चुकूनही ठेवू नका 'या' 5 गोष्टी; अन्यथा होतं मोठं नुकसान अन् मानसिक त्रास
हे ही वाचा : दिवसभर फ्रेश राहायचंय? फाॅलो करा पाणी पिण्याच्या 'या' स्मार्ट सवयी, त्वचा अन् आरोग्य दोन्ही राहील टवटवीत