श्रीमंत व्हायचं मग चांगल्या शाळा-कॉलेजमध्ये शिक्षण घ्यायला हवं जेणेकरून चांगली नोकरी मिळेल. यासाठी अनेकांचा अट्टाहास असतो. यासाठी पालक आपल्या मुलांवर कितीतरी पैसा खर्च करतात. यासाठी पालकांकडेही तितकाच पैसा असायला हवा. पण एका साध्या मजुराचा 34 वर्षांचा मुलगा ज्याने हिंदी मीडियम सरकारी शाळेतून शिक्षण घेतलं आहे. त्याने 4 कोटी रुपये बचत करून दाखवली आहे. आता ते कसं याचा सीक्रेट फॉर्म्युला त्याने रेडिट या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सांगितला आहे.
advertisement
तरुणाची संपूर्ण पोस्ट
"मी 34 वर्षांचा झालो आणि नुकतंच मी सेव्हिंग केलेल्या पैशांचा आकडा 4 कोटी पार गेला आहे. ही बचत वडिलोपार्जित नाही, लॉटरी नाही तर माझ्या दहा वर्षांचे प्रयत्न, संयम आणि शिस्तबद्ध राहणीमानामुळे.
मी एका लहान गावात जन्मलो आणि वाढलो. हिंदी माध्यमाच्या सरकारी शाळेत माझं शालेय शिक्षण झालं. माझे वडील रोजंदारीवर काम करायचे. कुटुंबाचं पोट भरेल इतपत पैसे कमवत होते. तरीही काहीतरी करून ते मला काही पुस्तकं विकत घेऊन देत असत. जेव्हा मला वाईट वाटायचं तेव्हा प्रोत्साहनाचे शब्द सांगत असत ते एकदा मला म्हणाले होते, ज्या दिवशी लोक मला तुमच्यामुळे ओळखतील, तेव्हा मला अभिमान वाटेल. ते वाक्यच माझ्यासाठी प्रेरणादायी ठरलं. मला पुढे नेणारे इंधन बनलं.
भूक कशी असते, हे अजूनही मला आठवतं. जिथं तुमचं पोट दुखतं तिथंच नाही, तर जिथं तुम्हाला शांतपणे ब्रँडेड लेव्हीज टी-शर्ट घालायचा आहे तिथंदेखील. ते महाग आहे म्हणून नाही, तर तुम्हाला फक्त शहरातील गर्दीत सामान्य वाटायचं आहे म्हणून.
मला योगायोगाने कॉम्प्युटर मिळाला. मी त्याच्या प्रेमात पडलो आणि हळूहळू त्या आवडीभोवती माझं जीवन घडवू लागलो. मला टेक क्षेत्रात चांगली नोकरी मिळाली. मी प्रामाणिकपणे काम केलं. मी अनावश्यक खर्च टाळले, हुशारीने बचत केली आणि अखेर पार्ट टाइम बिझनेस सुरू केला. मला कुणी मार्गदर्शन करणारा नव्हता. मी माझ्या स्वतःच्या चुकांमधून, YouTube वरील मोफत व्हिडीओ आणि काही चांगल्या पुस्तकांमधून शिकलो.
कुणी 20 वर्षांनी मोठी, कुणी विवाहित! 'भाभीजी'च्या प्रेमात का पडत आहेत तरुण, नात्याचा शेवट मृत्यू
आज माझ्याकडे एक कार आणि एक बाईक आहे. माझ्याकडे अद्याप घर नाही आणि मला त्याची घाई देखील नाही. भौतिक गोष्टींपेक्षा, मला अभिमान आहे की मी असे जीवन निर्माण केलं आहे जे पाहून माझे वडील आनंदी होतील"
का सांगितला हा प्रवास?
आपण ही स्टोरी का शेअर करत आहोत, यामागील कारणही या तरुणाने सांगितलं आहे. तो म्हणाला, "बाहेर कुठेतरी, एका लहान शहरात, कदाचित कुणालातरी सध्या असहाय्य वाटत असेल. कुणीतरी ज्याने सरकारी शाळेत शिक्षण घेतलं आहे, कोणीतरी ज्याला आपलं इंग्रजी पुरेसं चांगलं नाही असं वाटतं, कोणीतरी जो असे मानतो की स्वप्नं फक्त काही खास लोकांनीच पाहायची असतात. त्या व्यक्तीला मी म्हणू इच्छितो, जर मी ते करू शकलो तर तुम्हीही करू शकता. तुम्हाला अस्खलित इंग्रजी बोलण्याची गरज नाही. तुम्हाला उच्चभ्रू पदवीची गरज नाही. तुम्हाला फक्त भूक, सातत्य आणि स्वतःवर विश्वास हवा आहे.
From a Hindi-medium village boy to ₹4 Crore in savings at 34 – If I can, you can too. byu/Middle_Ad4237 innoida
मी अजूनही शिकत आहे. अजूनही वाढत आहे. अजूनही जमिनीवर आहे. जर ही कहाणी तुमच्या मनात रुजली असेल तर मला तुमच्या कोणत्याही प्रश्नांची उत्तरे देण्यास आनंद होईल. मग ती मी केलेल्या चुकांबद्दल असो, मी वापरलेल्या साधनांबद्दल असो किंवा गेल्या दहा वर्षांत मी भावना आणि शिस्त कशी व्यवस्थापित केली याबद्दल असो. वाचल्याबद्दल धन्यवाद. मजबूत राहा, घडत राहा."
तरुणाच्या वाढदिवशी आर/नोएडा या रेडिट अकाऊंटवर ही पोस्ट शेअर करण्यात आली आहे. यावर बऱ्याच लोकांनी कमेंट केल्या आहेत. हृदयस्पर्शी, प्रेरणादायी अशा शब्दात कमेंट व्यक्त केल्या आहेत. तुम्हाला या तरुणाची कहाणी कशी वाटली आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.
