TRENDING:

Snake Fact: कोणत्या सापाचं विष जास्त लवकर चढतं? किती वेळ माणूस राहू शकतो जिवंत!

Last Updated:

सापाच्या दंशामुळे अनेकांचा मृत्यू होतो. वेळेत उपचार मिळाले नाही तर लोक आपला जीव गमावून बसतात. त्यामुळे लोक सापाच्या हल्ल्याला खूप घाबरतात. भल्याभल्यांनाही साप घाम फोडतो.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
नवी दिल्ली : सापाच्या दंशामुळे अनेकांचा मृत्यू होतो. वेळेत उपचार मिळाले नाही तर लोक आपला जीव गमावून बसतात. त्यामुळे लोक सापाच्या हल्ल्याला खूप घाबरतात. भल्याभल्यांनाही साप घाम फोडतो. कोणत्या सापाचं विष लवकर चढतं तुम्हाला माहितीय का? कुठला साप जास्त धोकादायक असतो?
कोणत्या सापाचं विष जास्त लवकर चढतं?
कोणत्या सापाचं विष जास्त लवकर चढतं?
advertisement

सर्व साप विषारी नसतात मात्र जे विषारी असतात त्यांच्यामध्येही वेगळे प्रकार अशतात. सापाच्या हल्ल्यानंतर लोक तासनतास जिवंत राहतात. मात्र काही असे साप असतात ज्यांचं विष वेगानं चढतं आणि लोकांचा जीव घेतं. अशा सापांच्या विषामुळे लोकांचा तात्काळ मृत्यू होतो. सापांना त्यांचे शिकार पकडण्यासाठी नखे किंवा शक्तिशाली जबडा नसतो. म्हणूनच त्यांची उत्क्रांती अशी झाली आहे की ते विषाने मारतात.

advertisement

बॉम्बसारखा फुटला एसी, आग इतकी की पाहणाऱ्यांचा उडाला थरकाप, Video Viral

सापाच्या विषामध्ये शेकडो विविध एंजाइम आणि प्रथिने यांचे मिश्रण असते. काही सापांचे विष इतके प्राणघातक असते की ते संपूर्ण मज्जासंस्था अर्धांगवायू करते. हृदयाचे ठोके थांबवतात. नसांमधूनही रक्त गळू लागते. कोब्रा चावल्यानंतर त्याच्या शरीरात सुमारे 200 ते 500 मिलीग्राम विष सोडते. काही संशोधनात असाही दावा करण्यात आला आहे की एकदा चावल्यानंतर ते 7 मिलीलीटर पर्यंत विष सोडू शकतात. किंग कोब्रा चावल्यास पीडित व्यक्ती बेशुद्ध पडते, दृष्टी अंधुक होते आणि शरीरावर अर्धांगवायूचा परिणाम होतो.

advertisement

किंग कोब्रा देखील इतर सापांपेक्षा जास्त विष तयार करतो. त्यातील एक दशांश विष देखील 20 लोकांचा जीव घेऊ शकते. सापाचे विष किती लवकर मारता येईल? तर ते विषाचे प्रमाण आणि व्यक्तीची प्रतिकारशक्ती यावर अवलंबून असते. बहुतेक प्रकरणांमध्ये, कोब्रा चावल्यानंतर व्यक्ती 2 ते 5 तास जिवंत राहते.

मराठी बातम्या/Viral/
Snake Fact: कोणत्या सापाचं विष जास्त लवकर चढतं? किती वेळ माणूस राहू शकतो जिवंत!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल