बॉम्बसारखा फुटला एसी, आग इतकी की पाहणाऱ्यांचा उडाला थरकाप, Video Viral
- Published by:Sayali Zarad
Last Updated:
उन्हाच्या कडाक्यानं लोकांना हैराण करुन सोडलंय. त्यामुळे लोकांना घरात ऑफिसमध्ये फॅन, एसीची गरज भासते. एसी आणि पंख्यांविषयी अनेक गोष्टी समोर येत आहेत.
नवी दिल्ली : उन्हाच्या कडाक्यानं लोकांना हैराण करुन सोडलंय. त्यामुळे लोकांना घरात ऑफिसमध्ये फॅन, एसीची गरज भासते. एसी आणि पंख्यांविषयी अनेक गोष्टी समोर येत आहेत. अशातच एसीविषयी धक्कादाय घटना समोर आलीय. एसी बॉम्बसारखा फुटला असून याचा व्हिडीओ आगीसारखा सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
गरमीमुळे लोकांना एसीची आवश्यकता मोठ्या प्रमाणावर भासत आहे. अशातच एसीचा स्फोट होण्याच्या घटना समोर येत आहेत. अशाच आणखी एका घटनेनं सर्वांचं लक्ष वेधलंय.
पंजाबमधील रोपडमधून ही घटना समोर आलीय. एसीला अचानक भीषण आग लागली आणि एसीचा स्पोट झाला. घराच्या छतावर ठेवलेला एसी बॉम्बसारखा फुटला. @VivekSi85847001 नावाच्या X अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओ समोर येताच खळबळ उडाली असून व्हिडीओवर भरपूर कमेंट येत आहेत.
advertisement
Another Video from Ropar, Punjab showing burning of AC due to Excess Heatwave. But other genuine reason is also their for this
>Didn't installed Stabilizer to balance current
>not having Plastic Shed to protect it from Sun
>Continuosly using AC for hrs & hrs.. https://t.co/uG74I7hcWl pic.twitter.com/4aUUiw2Wag— Vivek Singh (@VivekSi85847001) May 29, 2024
advertisement
दरम्यान, व्हिडीओमध्ये व्यक्तीचा आवाज येतोय, तो म्हणतोय एसीला करंट स्टेबलाइजसाठी स्टेबलाइजर लावला नव्हता म्हणून आग लागली. आणि छतावर त्यावर कुठलीही सेफ्टी नव्हती. उन एसीवर पडत असल्यामुळेही असं झालं असून शकतं.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
June 02, 2024 7:06 PM IST