नागपुरातील महाजनवाडी येथील जयस्वाल नगर भागात राहणारे पंकज कुवरे, यांच्या घरात हा अजब गजब भीतीदायक प्रकार घडला आहे. कुवरे यांच्या घरातील सदस्य रात्री बेडवर झोपत असताना उशी खाली हालचाल होत असल्याचं लक्षात आलं. ते घाबरले, जीव मुठीत धरून त्यांनी थरथरत्या हाताने उशी उचलण्याची हिंमत केली. उशी उचलली. खाली पाहतो तर काय? असं काही दिसलं की त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली.
advertisement
VIDEO : आधी येत होता विचित्र आवाज, नंतर जवळ जाताच हलू लागली उशी, उघडून पाहिलं तेव्हा...
तुम्हालाही वाचू धक्का बसले. बेडवर उशीखाली चक्क कोब्रा नाग होता. जो जगातील सगळ्यात खतरनाक विशारी सापांपैक एक आहे. प्रसंगावधान राखत पंकज कुवरे यांनी सर्पमित्रांना फोन करून बोलावलं. सर्प मित्र आकाश मेश्राम याने शिताफीने नागाला पकडलं.
आता सगळ्यात मोठा प्रश्न साप बेडवर आला कसा? तर बेडच्या जवळच एक खिडकी आहे. या खिडकीतूनच नाग आत शिरल्याचा अंदाज आहे. पावसाळ्याच्या दिवसात बिळात पाणी शिरल्याने साप बाहेर येतात आणि उबदार जागा शोधतात त्यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याच आवाहन सर्प मित्रांनी केलं आहे.
ही झाडं घराभोवती असतील तर घरात सापांची होईल एण्ट्री
सापांना झाडांच्या आजूबाजूला राहायला आवडते. त्यामुळे घराभोवती अशी काही झाडे असतील जी सापांना आकर्षित करतील तर सतर्क राहण्याची गरज आहे. तुमच्या घरातही साप शिरु शकतो.
सापांना काही ठराविक झाडांचा वास आवडतो. त्यामुळे ते तिकडे आकर्षित होतात. घराच्या आजूबाजूला जर ही झाडे असतील तर घरातही सापा शिरु शकतात.
आई लेकरांना अंघोळ घालतानाचा VIDEO, पण पोरांना पाहून नेटिझन्स घामाघूम
घराजवळ चंदनाचं झाड लावलं असेल तर तुम्हाला पावसाळ्यात काळजी घ्यावी लागेल. तज्ञांच्या मते, साप चंदनाच्या झाडांजवळ साप राहतात कारण त्यांना त्याचा सुगंध आवडतो आणि झाडाला थंडपणाही असतो.
चमेलीच्या रोपांनाही साप आकर्षित होतात. त्यामुळे घराच्या बाजूला जर हे चमेली असेल तर सापांचाही धोका वाढतो.
सायरप्रसच्या झाडांवर साप आपलं घर करतात. झाडाची पाने जाड असल्यामुळे ते पानांखीली लपून आपलं भक्ष्य पकतात. त्यामुळे घराच्या बाजूला हे झाड असल्यास खिडक्य, दरवाजे आठवणाने बंद करत जा.
लिंबू आणि संत्र्याच्या झाडांवरही सापा फिरतात. कारण ही फळं खाण्यासाठी किटक, उंदीर फिरत असतात. त्यांना खाण्यासाठी सापही तेथे वेटोळे घालून बसतात.