परदेशी महिलेनं अलीकडेच तिच्या 250 वर्षे जुन्या घराबद्दल एक आश्चर्यकारक गोष्ट सांगितली. तिच्या घराच्या जमिनीखालून आवाज येत होता. जेव्हा तिनं फरशी काढली तेव्हा तिला धक्का बसला कारण तिला त्याखाली 250 वर्षे जुनं रहस्य सापडलं.
कित्येक वर्ष बंद होतं घर, घाबरत घाबरत आत गेली व्यक्ती, भिंतीला हात लावताच फळफळलं नशीब
advertisement
अमेलिया नावाची एक महिला सोशल मीडियावर हॉन्टेड अमेलिया या नावाने प्रसिद्ध आहे. तिने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म टिकटॉकवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे, ज्यामध्ये त्याने सांगितलं आहे की तिला 250 वर्षे जुन्या घराखाली एक अतिशय आश्चर्यकारक गोष्ट दिसली. तिनं सांगितलं की घरात लाकडी फरशी होती, जी आतून पोकळ वाटत होती आणि त्यावरून चालताना एक प्रकारचा आवाज येत होता. तिला वाटलं की ती फरशी दुरुस्त करेल.
जेव्हा तिनं लाकडी फरशी काढली तेव्हा तिला त्याखाली एक जुनं नाणं सापडलं जे 1904 मध्ये एडवर्ड 7च्या काळातील होतं. याशिवाय सोन्याने रंगवलेलं एक पुस्तकही सापडलं. तो आवाज एका नाण्यातून येत होता. पुस्तकही खूप घाणेरडं होतं. पुस्तकात जुना फोटो होतो. त्या फोटोंपैकी एक असं घर होतं, जे रिकामं होतं. आत आणखी काही छोट्या छोट्या गोष्टी होत्या.
स्टेशनवर थांबली ट्रेन, प्लॅटफॉर्मवर उतरलं कपल, नाव ऐकताच जीआरपी पोलिसांची पळापळ
द सन वेबसाइटच्या वृत्तानुसार, या व्हिडिओवर लोकांनी कमेंट करून आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. लोकांनी पुस्तकाचं वास्तव काय आहे ते सांगितलं, एकानं म्हटलं की पुस्तक खूपच भयानक दिसते. पण काही लोकांनी सांगितलं की ते पुस्तक पोस्टेज पुस्तक होतं आणि त्यात दिसणारी सावली केवळ पुस्तक जुनं असल्याने होती. तथापि, लोकांना घरातून असं काहीतरी सापडण्याची ही पहिलीच वेळ नाही. असंही म्हटलं आहे.