कित्येक वर्ष बंद होतं घर, घाबरत घाबरत आत गेली व्यक्ती, भिंतीला हात लावताच फळफळलं नशीब
- Published by:Priya Lad
Last Updated:
Treasure found in closed house : आत जाताना ती व्यक्तीही घाबरली पण जसं आत जाऊन त्या व्यक्तीने त्या घराच्या भिंतीला स्पर्श केला तसं त्याचं नशीबच फळफळलं, त्याच्या हाती खजिनाच सापडला.
नवी दिल्ली : कित्येक वर्षे बंद पडलेलं जुनं, ओसाड घर. या घरात जायची कुणालाही भीती वाटेल. पण काही लोक इथं कुतूहलापोटी, संशोधनासाठी किंवा काही खजिना मिळेल म्हणून जातात. अशाच एका जुन्या घरात एक व्यक्ती गेली. आत जाताना ती व्यक्तीही घाबरली पण जसं आत जाऊन त्या व्यक्तीने त्या घराच्या भिंतीला स्पर्श केला तसं त्याचं नशीबच फळफळलं, त्याच्या हाती खजिनाच सापडला.
जुन्या घराचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. व्हिडीओमध्ये दाखवलेलं घर वर्षानुवर्षे ओसाड पडल्याचं दिसतं. त्या घराचे दरवाजेही तुटलेले आहेत. अशा स्थितीत ही व्यक्ती घाबरून आत गेली. त्या माणसाच्या हातात मेटल डिटेक्टर मशीन आहे. एवढंच नाही तर त्या व्यक्तीच्या मागे एक कुत्राही घुसला आहे. ती व्यक्ती जुन्या घराच्या भिंतीवर मेटल डिटेक्टर ठेवते आणि हळू हळू पुढे सरकते. मेटल डिटेक्टर भिंतीच्या खांबाजवळ आवाज करू लागतं. ती व्यक्ती लगेच तिथं क्रॉसचे चिन्ह बनवतं. यानंतर भिंत तोडते.
advertisement
थोड्याच वेळात, भिंतीला एक लहान छिद्र दिसतं, ज्यामुळे आत काहीतरी लपलेलं आहे, असं दिसून येतं. अशा स्थितीत ती व्यक्ती भिंतीवर अधिक हातोडा मारायला लागते. यानंतर त्याने भिंतीच्या आत हात टाकताच त्यामध्ये लपवलेली एक छोटी पिशवी बाहेर येते. ती व्यक्ती आणखीनच भिंत तोडायला लागते. भिंतीतून एक वीटही काढते. आत एक धातूचा कप आहे. अशा स्थितीत ती व्यक्ती त्याला बाहेर काढते. त्या कपाचा वरचा भाग आधी बाहेर येतो, मग पूर्ण कप बाहेर येतो. कपच्या आत डोकावताच अनेक नोटा लपवलेल्या आढळतात.
advertisement
advertisement
या व्यक्तीने एका झटक्यात खजिना सापडला, ज्याची किंमत खूप जास्त असेल. न्यूज 18 मराठीने हा व्हिडिओ खरा की खोटा याची पुष्टी केली नाही. कारण, ज्या व्यक्तीने ते शेअर केले आहे त्याने स्वत:चे आर्टिस्ट म्हणून वर्णन केलं आहे. अशा परिस्थितीत, हा व्हिडीओ खरा आहे की मनोरंजनाच्या उद्देशाने ते माहिती नाही.
Location :
Delhi
First Published :
January 25, 2025 12:56 PM IST
मराठी बातम्या/Viral/
कित्येक वर्ष बंद होतं घर, घाबरत घाबरत आत गेली व्यक्ती, भिंतीला हात लावताच फळफळलं नशीब