ही लव्ह स्टोरी आहे मलेशियातील बिझनेस टायकून खू के पेंग आणि माजी मिस मलेशिया पॉलिन यांच्या मुलीची. खू के पेंग कोरस हॉटेलचे संचालक आहेत. ते मलेशियातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत 44 व्या क्रमांकावर आहेत. अशा बड्या उद्योगपतीची मुलगी अँजेलिन फ्रान्सिस मात्र एका गरीबाच्या प्रेमात पडली. जेडिडिया फ्रान्सिस असं तिच्या बॉयफ्रेंडचं नाव. अँजेलिन ऑक्सफर्डमध्ये शिकत असताना तिची भेट जेडेडियाशी झाली. दोघंही प्रेमात पडले.
advertisement
अशीसुद्धा एक सरकारी योजना? बॉयफ्रेंडने दिला धोका, तरुणीला सरकारकडून मिळाले 83 लाख; कसे ते पाहा
जेव्हा अँजेलिनने तिच्या कुटुंबाला तिच्या प्रेमाबद्दल सांगितलं तेव्हा त्यांनी ते नाकारलं. कारण अँजेलिनचा बॉयफ्रेंड सामान्य कुटुंबातून होता. त्यांन तिला धमकावलं, प्रेम तोडण्यास सांगितलं. पण अँजेलिनला त्याच्याशीच लग्न करायचं होतं. जेव्हा वडिलांचा वारसा आणि बॉयफ्रेंड यांच्यातील एक काहीतरी निवडण्याची वेळ तिच्यावर आली तेव्हा तिनं बॉयफ्रेंडला निवडलं. संपत्ती आणि प्रेमात तिनं प्रेम निवडलं.
बॉयफ्रेंडशी लग्न करण्यासाठी तिनं 300 मिलियन अमेरिकन डॉलर्स म्हणजे तब्बल 2500 कोटी रुपयांच्या संपत्तीचा त्याग केला. अँजेलिनने 2008 मध्ये जेदेडियाशी लग्न केलं. विलासी जीवन सोडून प्रेम निवडले. आता ती सर्वसामान्य आयुष्य जगते आहे.
प्रेमासाठी एवढा त्याग करण्याची ही पहिलीच वेळ नाही. 2021 मध्ये जपानच्या राजकुमारी माकोनेही एका सामान्य व्यक्तीशी लग्न केलं होतं. कोमुरोआ असं त्याचं नाव. तो तिचा कॉलेजचा बॉयफ्रेंड आणि साधा माणूस होता. राजकुमारी माको ही जपानी सम्राटाची भाची , परंतु लग्नानंतर तिने प्रेमासाठी तिची पदवी सोडली.