अमेरिकेतील ही घटना आहे. न्यूयॉर्कहून हाँगकाँगला एक पार्सल पाठवण्यात आलं होतं. पार्सलच्या बॉक्सवर प्लॅस्टिक अॅनिमल टॉय असं लेबल होतं. प्रत्यक्षात बॉक्समधून काही विचित्र आवाज येत होते, ज्यामुळे अधिकाऱ्यांना सावध केलं गेलं. जेव्हा अधिकाऱ्यांनी ते उघडले तेव्हा ते हैराण झाले.
उरले फक्त 100 दिवस, पृथ्वी..., हार्वर्ड शास्त्रज्ञाच्या दाव्याने उडाली खळबळ, कोणतं संकट?
advertisement
खेळण्यांच्या या बॉक्समध्ये 850 जिवंत कासवं भरलेली होती. जी मोज्यांमध्ये बांधलेली होती आणि टेपने पॅक केलेली होती. ही अमेरिकेतील मूळ प्रजाती असलेल्या ईस्ट बॉक्स आणि थ्री-टोड बॉक्स प्रजातींची कासवं होती. ही कासवं त्यांच्या रंगीबेरंगी स्वरूपामुळे चीन आणि हाँगकाँगच्या पाळीव प्राण्यांच्या बाजारात खूप पसंत केली जातात. ज्यामुळे त्यांची तस्करी केली जात होती.
मेरिकेच्या न्याय विभागाच्या म्हणण्यानुसार, न्यू यॉर्कमधील ब्रुकलिनमध्ये राहणाऱ्या वेई कियांग लिन नावाच्या व्यक्तीने ही कासवं तस्करी केल्याचा आरोप आहे . त्याने हे प्राणी एका डिलिव्हरी बॉक्समध्ये पॅक केले आणि ते हाँगकाँगला पाठवले.
Child Video : गुपचूप पलंगात लपला मुलगा, उघडून पाहिलं तेव्हा... आईच्या काळजाचं पाणी पाणी झालं
न्यायालयीन नोंदींनुसार ऑगस्ट 2023 ते नोव्हेंबर 2024 दरम्यान लिनने अशी सुमारे 222 पार्सल हाँगकाँगला पाठवली, ज्यावर प्लॅस्टिक अॅनिमल टॉय असं लेबल लावण्यात आलं होतं. अधिकाऱ्यांनी सीमा तपासणीदरम्यान हे पार्सल पकडलं. या प्रकरणाची चौकशी यूएस फिश अँड वाइल्डलाइफ सर्व्हिसने केली होती, ज्याला कस्टम्स अँड बॉर्डर प्रोटेक्शन आणि होमलँड सिक्युरिटी इन्व्हेस्टिगेशन्स सारख्या एजन्सींनी देखील मदत केली होती.
वेईने न्यू यॉर्कमधील अमेरिकन जिल्हा न्यायालयात आपला गुन्हा कबूल केला. त्याला 5 वर्षांपर्यंत तुरुंगवास आणि 250,000 डॉलर्स म्हणजे सुमारे 2 कोटी रुपयेांचा दंड होऊ शकतो. लिनला 23 डिसेंबर रोजी शिक्षा सुनावण्यात येणार आहे.