2 ऑगस्टला पूर्ण सूर्यग्रहण होईल. तेही पूर्ण 6 मिनिटं. पूर्ण सूर्यग्रहणामुळे संपूर्ण आकाश दिवसा अंधारात बुडेल. असं मानलं जातं की हे सूर्यग्रहण अटलांटिक महासागरापासून सुरू होईल. नंतर ते जिब्राल्टरच्या सामुद्रधुनी, दक्षिण स्पेन, उत्तर मोरोक्को, उत्तर अल्जेरिया, उत्तर ट्युनिशिया, ईशान्य लिबिया, इजिप्त, सुदान, नैऋत्य सौदी अरेबिया, येमेन, सोमालिया आणि अरबी द्वीपकल्पातील इतर देशांमध्ये जाईल. हिंदी महासागरावर ते मंद असेल.
advertisement
पृथ्वीचा फिरण्याचा वेग वाढला! कधीच घडलं नाही ते घडणार, उरले फक्त काही दिवस
बहुतेक सूर्यग्रहणं 3 मिनिटांपेक्षा कमी काळ टिकतात, इतिहासातील सर्वात मोठं पूर्ण सूर्यग्रहण 7 मिनिटे आणि 28 सेकंदांचं होतं जे 743 ईसापूर्वमध्ये घडलं. या सूर्यग्रहणाला 'ग्रेट नॉर्थ आफ्रिकन एक्लिप्सन' असंही म्हटलं जात आहे. याचं कारण म्हणजे ते आफ्रिकेतील बहुतेक देशांमधून दिसलं. 2 ऑगस्ट 2027 रोजी होणाऱ्या पूर्ण सूर्यग्रहणामुळे जगातील अनेक भाग पूर्ण 6 मिनिटं अंधारात बुडालेले राहतील. जगातील विविध खंडांवर राहणारे कोट्यावधी लोक हे दृश्य पाहू शकतील. पुढील 100 वर्षे 2114 पर्यंत असं सूर्यग्रहण पुन्हा दिसणार नाही.
OMG! NASA च्या बंद पडलेल्या सॅटेलाईटमधून आला मेसेज, कसा काय? शास्त्रज्ञही हैराण
अशा सूर्यग्रहणाचं कारण म्हणजे सूर्य, चंद्र आणि पृथ्वी यांच्यातील दुर्मिळ खगोलीय संरेखन. इतक्या लांब सूर्यग्रहणाची तीन मुख्य कारणं आहेत. पहिलं म्हणजे पृथ्वी सूर्यापासून सर्वात दूर अंतरावर असेल. याला अपेलियन म्हणतात. यामुळे, सूर्य पृथ्वीपासून लहान दिसेल. त्याच वेळी, चंद्र पृथ्वीच्या सर्वात जवळ असेल, ज्यामुळे तो मोठा दिसेल. तिसरं म्हणजे, चंद्राची सावली विषुववृत्तावर पडेल आणि सावली मंद गतीने वाढेल.