जगातील सात आश्चर्यांपैकी एक ताजमहाल, प्रेमाचं प्रतीक मानलं जातं. शाहजहानने बेगम मुमताजच्या स्मरणार्थ बांधला होता. या ताजमहालच्या आत शाहजहान आणि मुमताजची कबर आहे.ताजमहाल पर्यटन स्थळ असलं तरी इथं सगळीकडेच जाता येतं असं नाही. ताजमहालमध्ये असे काही भाग आहेत, जिथं सर्वसामान्य लोकांना जायला बंदी आहे. हे भाग क्वचितच खुले होतात आणि तिथं जाता येतं. सामान्य लोकांना तिथे जाण्याची परवानगी नाही. अशाच एका भागात एक व्यक्ती गेली. या व्यक्तीने त्या भागाचा व्हिडीओही बनवला.
advertisement
Flight : उघडा होता कॉकपिटचा दरवाजा, दृश्य पाहून एअरहॉस्टेसच्या पायाखालची जमीनच सरकली, पायलट...
व्हिडीओत तुम्ही पाहू शकता सुरुवातीला ताजमहालच्या आतील मुमताज आणि शाहजहान यांची कबर दिसते. त्यानंतर ही व्यक्ती कॅमेरा खालच्या दिशेकडे घेते. जिथं काही जिने दिसतात. हे जिने खालच्या दिशेने जाणारे आहेत. व्यक्ती हळूहळू आत उतरते. वरून गजबजलेला, लोकांच्या गर्दीने भरलेला ताजमहाल, पण या भागात आत कुणीच नाही. अगदी स्मशानशांतता आहे असं म्हणायला हरकत नाही. अशा ठिकाणी ही व्यक्ती एकटीच आहे.
व्यक्ती जशी खाली उतरते तसं समोर दोन कबरी दिसतात. अगदी जशा कबरी वर आहेत तशाच दोन अगदी त्याच्या खाली आहेत. ताजमहालच्या वरच्या भागात असलेल्या कबरी प्रतीकात्मक आहेत तर या खालच्या कबरी खऱ्या कबरी आहेत असं सांगितलं जातं. ताजमहाल आणि या दोन कबरीच्या सुरक्षिततेचा विचार करता इथं प्रवेश बंदी घातली आहे.
@dinbhar_bharat इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. व्हिडिओने इंटरनेटवर अनेकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. बऱ्याच लोकांनी यावर कमेंट केला आहेत. एका युझरने सांगितलं की एकेकाळी हा भाग सर्वसामान्यांसाठी खुला होता. 1994-95 च्या सुमारास त्याने हा भाग पाहिल्याचं त्याने सांगितलं. तर एका युझरने या भागात प्रवेश कसा मिळाला असं विचारलं आहे.
OMG! रोबो प्रेग्नंट, पोटात माणसाचं बाळ? हे कसं शक्य आहे?
तुम्ही ताजमहालला प्रत्यक्षात पाहिला आहे का? आणि हो तर ताजमहालच्या या भागात गेला होतात का? आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.
