तामिळनाडूमध्ये पाणीपुरी विकणाऱ्या एका व्यक्तीने ऑनलाइन पेमेंट द्वारे वर्षाला ४० लाख रुपयांची कमाई केली आहे. त्यानंतर त्याला GSTची नोटीस मिळाली आहे. जीएसटीकडून आलेली ही नोटीस सोशल मीडियावर व्हायरल होत असून ज्यावर आता मोठ्या कंपन्यांमध्ये नोकरी करणाऱ्यांना डोक्यावर हात लावण्याची वेळ आली आहे.
मुलांनो ही चूक केल्यास सर्व काही गमवाल, मोठी किंमत चुकवावी लागेल
advertisement
एक्स वर @sanjeev_goyal या हॅडेलवरून एका पाणीपुरीवाल्याला आलेली जीएसटीची नोटीस शेअर करण्यात आली आहे. हा फोटो शेअर करताना म्हटले आहे की, तामिळनाडूच्या जीएसटी विभागाने एका पाणीपुरीवाल्याला नोटीस पाठवली आहे. कारण काय तर त्याने फोन पे, गुगल पेद्वारे वर्षाला ४० लाखांची विक्री केली आहे. यातील रोख विक्री वेगळी असेलच. आता ही बातमी वाचून तुम्हाला देखील थोडा धक्का बसला असेल.कदाचित असे देखील वाटले असेल की आपल्या नोकरीपेक्षा पाणीपूरीचा धंदा बरा.
कर्मचाऱ्यासांठी गुड न्यूज! Earned Leave बाबत उच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय
सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या नोटीसवर १७ डिसेंबर २०२४ची तारीख आहे. ही नोटीस तामिळनाडू गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स अॅक्ट आणि सेंट्रल जीएसटी एक्ट कलम ७० नुसार पाठवण्यात आली आहे. ज्यात विक्रेत्याकडून गेल्या ३ वर्षातील खरेदी-विक्रीचा तपशील मागवण्यात आला आहे. २०२३-२४ या आर्थिक वर्षातील मोठ्या कमाईवर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहेत. जीएसटीने ही माहिती ऑनलाइन पेमेंट प्लेटफॉर्मकडून गोळा केली आहे.
आता सोशल मीडियावर ही नोटीस व्हायरल झाल्यानंतर त्यावर चर्चा होणार नाही असे शक्यच नाही. अनेकांना ही नोटीस म्हणजे गंमत वाटली. काहींनी तर स्वत:ची नोकरीसोडून पाणीपुरी विकावी अशा कमेंट केल्या आहेत. देशात अनेक वर्षांपासून ऑनलाइन पेमेंटद्वारे व्यवहार होत आहेत. हे व्यवहार सहज, सोपे आणि झटपट होत असल्याने सर्वजण ऑनलाइन पैसे देण्यास प्राधान्य देतात.