जोधपूर जिल्ह्यातील रत्नाडा पोलीस स्टेशन परिसरातील ही घटना. इथं रात्री उशिरा मंदिर पाडल्याची घटना समोर आली आहे. रात्री तीन वाजता जेसीबी घेऊन काही लोक आले आणि त्यांनी मंदिर पाडण्याचा प्रयत्न सुरू केला. आवाज ऐकून परिसरातील नागरिक जमा झाले आणि त्यांनी जेसीबी थांबवला. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. मंदिर तोडण्याचा प्रयत्न झाल्याच्या घटनेने परिसरातील नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. श्रद्धा केंद्राकडे दुर्लक्ष सहन करणार नाही, असं लोकांचं म्हणणं आहे.
advertisement
700 वर्षे जुनी मशीद अचानक झाली गायब; त्याआधी जे घडलं ते...; मौलवीचा खळबळजनक खुलासा
गेल्या वर्षी राजस्थानमधील अलवर शहरातील टिळक मार्केटमध्ये असलेल्या बग्गी खानामध्ये एक प्राचीन मंदिर पाडण्यात आलं होतं, त्यानंतर लोकांनी विरोध करण्यास सुरुवात केली होती. पुरातन भेरू मंदिर अर्बन डेव्हलपमेंट ट्रस्टने जेसीबीने पाडल्याचं लोकांनी सांगितलं. हे मंदिर अर्बन डेव्हलपमेंट ट्रस्टने रात्रीच्या अंधारात जेसीबीच्या सहाय्याने पाडून वसाहतीतील रहिवाशांना धोका निर्माण केला होता.
या घटनेनंतर परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. लोकांनी अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी करत या मंदिराचे अभिषेक करून मूर्तीची प्रतिष्ठापना करण्याची मागणी केली. मंदिर बांधलं जात नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याचं त्यांनी सांगितलं होतं.
700 वर्षे जुन्या मशिदीतून रात्री विचित्र आवाज; सकाळी मशीदच गायब
याआधी दक्षिण दिल्लीतील 700 वर्षे जुन्या मशिदीतूनही रात्री असाच विचित्र आवाज आला होता. मेहरौली भागातील अखुंदजी मशीद 700 वर्षे जुनी होती, रझिया सुलतानच्या कारकिर्दीत ही मशीद बांधण्यात आली असा दावा केला जातो. बहारुल उलूम मदरसा त्याच अखुंदजी मशीद संकुलात होता. या मशीद संकुलात काही जुन्या कबरीही होत्या. रात्री लोकांना या मशिदीतून विचित्र आवाज आला आणि सकाळी ते नमाज पडायला गेले तेव्हा मशीद गायब झाली होती.
दिल्लीतील मेहरौली इथली अखुंदजी मशीद आणि बेहरूल उलूम मदरसा जमीनदोस्त करण्यात आली. मशीद आणि मदरसावर बुल्डोझर चालवण्यात आला. डीडीए म्हणजेच दिल्ली विकास प्राधिकरणाने पहाटे अतिशय गुप्तपणे संपूर्ण कारवाई केली आणि ही बेकायदेशीर मशीद पाडली. मशिदीच्या आवारात बुल्डोझरची कारवाई सुरू असताना स्थानिकांना त्याचा आवाज आला. पण लोकांनी या आवाजाकडे दुर्लक्ष केलं. कारण डीडीएच्या या कृतीची कोणालाच माहिती नव्हती किंवा कोणतीही नोटीस मिळाली नव्हती.
महाराष्ट्रातल्या ‘या’ किल्ल्यावर सूर्यास्तानंतर कोणी थांबत नाही; इथे फिरतात भुतं?
बुल्डोझरच्या कारवाईदरम्यान कोणताही त्रास होऊ नये म्हणून डीडीएने पहाटेची वेळ निवडली. पहाटेच्या सुमारास आजूबाजूचे लोक झोपले असताना डीडीएने अत्यंत गुप्तपणे 700 वर्षे जुन्या मशिदीवर बुल्डोझर चालवला. या कारवाईची माहिती लोकांनाही कळू नये, यासाठी अवघ्या काही मिनिटांत मशीद आणि मदरशाचा ढिगारा हटवण्यात आला. यावेळी संपूर्ण परिसरात बॅरिकेडिंग करण्यात आले. संपूर्ण संकुलात CISF तैनात करण्यात आले होते. 30 जानेवारीला ही कारवाई करण्यात आली.
