TRENDING:

प्राणी चावणं परवडला पण माणूस नको, इतका भयंकर परिणाम पाहून सगळे घाबरले

Last Updated:

Human bite cause infection : एक दरोडेखोर वृद्ध व्यक्तीच्या हाताला चावला, डॉक्टरांनी किरकोळ जखम समजून उपचार केले आणि त्याला घरी पाठवलंं. पण नंतर त्याची तब्येत बिघडू लागली.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
इस्तंबूल : जर एखाद्या व्यक्तीला प्राणी चावला की भीती वाटते. आता काय होईल, कोणता संसर्ग होईल, कोणती जखम होईल, ती बरी होईल की नाही? असे एक ना दोन कितीतरी विचार मनात येताच. पण हाच जर माणूस चावला तर फार गांभीर्याने घेतलं जात नाही. प्राण्याऐवजी माणूस चावला तर काय होईल? याचा विचार तरी तुम्ही कधी केला होता का? इतका भयानक परिणाम की तुम्ही कल्पनाही केली नसेल. माणसाने माणसाला चावण्याचं असं एक धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे.
प्रतीकात्मक फोटो
प्रतीकात्मक फोटो
advertisement

तुर्कीतील इस्तंबूलची ही घटना आहे. एका दुकानात दरोडेखोर घुसले. दुकानाचा मालक त्यावेळी दुकानातच होता, त्याचं वय 60 वर्षे. त्याने एका दरोडेखोराला पकडण्याचा प्रयत्न केला. तेव्हा दरोडेखोर त्याच्या तावडीतून सुटण्यासाठी म्हणून त्याच्या हाताला जोरात चावला. दरोडेखोर तर तिथून पळाला पण वृद्ध व्यक्तीच्या हाताला जखम देऊन गेला. ती व्यक्ती उपचारासाठी जवळच्या क्लिनिकमध्ये गेली. जिथं त्याची जखम किरकोळ समजून उपचार केले आणि त्याला घरी पाठवलंं.

advertisement

Shocking! अंगावर पडली बायको आणि नवऱ्याचा मृत्यू, कारणही धक्कादायक

पण नंतर त्याची तब्येत बिघडू लागली, त्याला ताप येऊ लागला, तो थरथर कापू लागला. त्याने मोठ्या रुग्णालयात धाव घेतली. तिथं पोहोचल्यानंतर डॉक्टरांनी त्याची तपासणी केली तेव्हा जे समजलं ते ऐकून त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. चोर चावल्याने त्याच्या शरीरात इन्फेक्शन झालं होतं.  जो कुत्रा किंवा इतर प्राण्यांच्या चाव्यापेक्षा जास्त धोकादायक वाटला. सर्व प्रयत्न करूनही प्रकृती लवकर सुधारली नाही. त्याच्या हाताचा रंग बदलला आणि तो दुप्पट आकाराचा झाला. परिस्थिती इतकी बिकट झाली की त्याचा हात कापायची वेळ आली. पण डॉक्टरांनी तेव्हा हायपरबेरिक ऑक्सिजन थेरपीचा अवलंब केला, ज्यामुळे संसर्ग नियंत्रित झाला आणि तीन महिन्यांच्या फिजिओथेरपीनंतर हात पूर्णपणे बरा झाला.

advertisement

Health Tips : पाणी खा आणि चपाती प्या, टायपो मिस्टेक नाही हा डॉक्टरांनी दिलेला सल्ला

ही घटना सुमारे एक वर्षापूर्वी घडली होती, परंतु ती नुकतीच उघडकीस आली. जेव्हा वृद्धावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी त्यांची केस स्टडी एका मेडिकल जर्नलमध्ये प्रकाशित केला.  हे प्रकरण मानवी चाव्याद्वारे होणाऱ्या धोकादायक संसर्गाचं एक गंभीर उदाहरण आहे. मानवी चाव्यामुळे काही अवांछित आणि धोकादायक जीवाणू दुसऱ्या शरीरात देखील संक्रमित होऊ शकतात, ज्यामुळे समस्या आणखी वाढू शकते.

advertisement

मराठी बातम्या/Viral/
प्राणी चावणं परवडला पण माणूस नको, इतका भयंकर परिणाम पाहून सगळे घाबरले
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल