'टाइम्स ऑफ इंडिया'च्या वृत्तानुसार, घरातील पती-पत्नीचा गुपचूप अश्लील व्हिडिओ बनवल्यानंतर चोर विनयने दाम्पत्याकडे 10 लाख रुपयांची मागणी सुरू केली. तो व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊ लागला. मात्र, त्याने चोरीच्या फोनने व्हिडिओ शूट केला होता. पोलिसांनी सांगितलं की, आरोपीनी या जोडप्याला व्हॉट्सॲपवरून व्हिडिओ पाठवून ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. त्यामुळे पोलिसांना या प्रकरणाची उकल करणं सोपं झालं.
advertisement
म्हशीने दिला पिल्लाला जन्म; शेतकऱ्याने थेट पोलिसांनाच बोलावलं, कारण जाणून सगळेच चक्रावले
तपासादरम्यान पोलिसांना कळलं की, विनय कुमार साहू पूर्वी सरकारी नोकरीसाठी तयारी करत होता. तो अनेकवेळा नागरी परीक्षेलाही बसला आहे. पण तो नेहमीच अपयशी ठरला. यानंतर त्याने चोरी करून आपला उदरनिर्वाह करण्याचे ठरवले. तो आजूबाजूच्या लोकांचे मोबाईल चोरू लागला. गेल्या शुक्रवारी तो एका दाम्पत्याच्या घरात चोरी करण्यासाठी घुसला. तो तिथे चोरी करण्यासाठी काहीतरी शोधत असताना त्याची नजर पती-पत्नीवर पडली. दोघेही संबंध ठेवत होते. विनयने गुपचूप दोघांचे व्हिडिओ बनवायला सुरुवात केली.
दुसऱ्या दिवशी सकाळी त्याने तो व्हिडिओ पती-पत्नीला पाठवला. तसंच फोन करून 10 लाख रुपयांची मागणी केली. त्यांच्या खासगी क्षणांचा व्हिडिओ पाहून या जोडप्याला खूप आश्चर्य वाटलं. त्यांनी तक्रार घेऊन पोलीस ठाणे गाठलं. व्हॉट्सॲपवर व्हिडिओ आल्याची माहिती त्यांनी पोलिसांना दिली. याप्रकरणी दुर्ग पोलिसांनी विशेष पथक तयार केलं. बुधवारी पोलिसांनी चोरट्या विनयला अटक केली. त्याच्या फोनवरून अश्लील व्हिडिओ डिलीट करण्यात आला आहे.
