म्हशीने दिला पिल्लाला जन्म; शेतकऱ्याने थेट पोलिसांनाच बोलावलं, कारण जाणून सगळेच चक्रावले

Last Updated:

जेव्हा पोलीस शेतकऱ्याच्या घरी पोहोचले, तेव्हा त्याने सांगितलं, की त्याने दूध प्यायला त्यांना बोलावलं आहे.

शेतकऱ्याने थेट पोलिसांनाच बोलावलं
शेतकऱ्याने थेट पोलिसांनाच बोलावलं
लखनऊ : सोशल मीडियावर एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. यात एका शेतकऱ्याच्या घरात एका म्हशीने आपल्या पिल्लाला जन्म दिला. म्हशीला पिल्ली होताच शेतकरी कुटुंबाच्या आनंदाला पारावार उरला नाही. या आनंदाच्या क्षणी शेतकऱ्याने फोन उचलला आणि थेट पोलिसांना फोन केला. जेव्हा पोलीस शेतकऱ्याच्या घरी पोहोचले, तेव्हा त्याने सांगितलं, की त्याने दूध प्यायला त्यांना बोलावलं आहे. आता या प्रकरणाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. ही घटना उत्तर प्रदेशातील अमरोहा जिल्ह्यातील आहे.
अमरोहा जिल्ह्यातील रहरा पोलीस स्टेशन हद्दीतील खुशहालपुर गावातील रहिवासी जसवीर सिंह यांच्या म्हशीने काल रात्री एका पिल्लाला जन्म दिला. म्हशीच्या पिल्लाचा जन्म होताच कुटुंबात जल्लोषाचं वातावरण होतं. रात्री म्हशीने जन्म दिला आणि कुटुंबाच्या आनंदाला पारावार उरला नाही. यानंतर जसवीरने आपल्या फोनवरून पोलिसांना फोन केला. त्याने 112 क्रमांकावर फोन करून पोलिसांनाही आपल्या घरी बोलावले.
advertisement
मध्यरात्री पोलिसांना माहिती मिळाल्याने पोलिसांचे पथकही गावात पोहोचले. येथे पोहोचल्यानंतर पोलिसांनी जसवीरच्या घरी दार ठोठावलं तेव्हा त्याने संपूर्ण हकीकत सांगितली. जसवीरने पोलिसांना सांगितलं माझी कोणतीही तक्रार नाही, त्याने पोलिसांना फक्त दूध पाजण्यासाठी बोलावलं होतं. हे संपूर्ण संभाषण फोनवर रेकॉर्ड करण्यात आलं. आता त्याचा मजेशीर व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
advertisement
या व्हिडिओमध्ये पोलीस शेतकऱ्याला ओरडताना दिसत आहेत. या कृत्यामुळे पोलिसांनी शेतकऱ्याला खडसावलं. अशा गोष्टींवर पोलिसांचा वेळ वाया घालवू नका, असा सल्लाही पोलीस कर्मचाऱ्याने दिला. अशा मूर्खपणामुळे पोलिसांचा वेळ आणि संसाधने वाया जातात. शेतकऱ्यानेही पोलिसांचा हा सल्ला गांभीर्याने घेत पुन्हा असे कृत्य करणार नसल्याचे सांगितले. यानंतरही हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओवर लोक त्यांच्या प्रतिक्रियाही देत ​​आहेत.
view comments
मराठी बातम्या/Viral/
म्हशीने दिला पिल्लाला जन्म; शेतकऱ्याने थेट पोलिसांनाच बोलावलं, कारण जाणून सगळेच चक्रावले
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement