कष्टासह गरीबी संपणार! ५ नोव्हेंबरची देव दिवाळी 'या' राशींचे आयुष्य बदलणार, हा राजयोग आणणार सोन्याचे दिवस
- Published by:Ajit Bhabad
 
Last Updated:
Astrology News :  दिवाळीचा उत्साह संपताच आता भक्तांमध्ये “देवांची दिवाळी” म्हणजेच देव दीपावली साजरी करण्याची तयारी सुरू झाली आहे.
 दिवाळीचा उत्साह संपताच आता भक्तांमध्ये “देवांची दिवाळी” म्हणजेच देव दीपावली साजरी करण्याची तयारी सुरू झाली आहे. हिंदू पंचांगानुसार, कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षातील पौर्णिमेच्या दिवशी देव दीपावली साजरी केली जाते. यंदा ही शुभ तिथी ५ नोव्हेंबर २०२५ रोजी येत आहे. या दिवशी गंगा स्नान, दीपदान आणि भगवान विष्णू व देवी लक्ष्मीची पूजा केल्याने अपार पुण्य मिळते, अशी धार्मिक मान्यता आहे.
advertisement
advertisement
 वृषभ राशी - या राशीच्या व्यक्तींसाठी कार्तिक पौर्णिमा अत्यंत शुभ राहील. लक्ष्मीदेवीचा विशेष कृपादृष्टी तुमच्यावर राहील. अडकलेले पैसे परत मिळण्याची आणि नवीन उत्पन्नाचे मार्ग खुलण्याची शक्यता आहे. व्यावसायिक क्षेत्रात लाभ होईल आणि नवीन करार किंवा व्यवहारातून चांगला नफा मिळेल. नोकरी करणाऱ्यांना पदोन्नती आणि सन्मान मिळण्याची संधी आहे. घरात शांतता आणि समृद्धी नांदेल.
advertisement
 मिथुन राशी -   मिथुन राशीच्या लोकांसाठी कार्तिक पौर्णिमा भाग्यवृद्धीचा दिवस ठरणार आहे. या दिवशी केलेले धार्मिक कार्य, दान आणि दीपदान तुम्हाला अधिक फलदायी ठरेल. भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीचे आशीर्वाद लाभतील. आर्थिक स्थितीत सुधारणा होईल, नवीन संधी मिळतील आणि अडकलेली कामे पूर्ण होतील. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील आणि घरात शुभ प्रसंग घडतील.
advertisement
 कन्या राशी -  या राशीच्या लोकांसाठीही कार्तिक पौर्णिमा शुभ ठरणार आहे. व्यवसायात लाभाचे नवे मार्ग खुलतील आणि नोकरी करणाऱ्यांना पदोन्नतीची संधी मिळेल. जुनी अडचण सुटेल आणि प्रलंबित कामे पूर्ण होतील. लक्ष्मीदेवीच्या कृपेने आर्थिक स्थैर्य आणि आत्मविश्वासात वाढ होईल. या दिवशी केलेले पूजन आणि दान तुमच्यासाठी अधिक फलदायी ठरेल.
advertisement


